Mahesh kote-Sharad Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur First IT Park news : महेश कोठेंच्या प्रयत्नांना यश; शरद पवारांच्या हस्ते होणार सोलापुरात पहिल्या आयटी पार्कचे भूमिपूजन

सरकारनामा ब्यूरो

Solapur : सोलापुरातील पहिल्या आयटी पार्कचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते येत्या रविवारी (ता. १३ ऑगस्ट) होणार आहे. शहरात आयटी पार्क होण्यासाठी माजी महापौर महेश कोठे हे गेली काही वर्षांपासून प्रयत्नशील होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. (Sharad Pawar will hold the bhoomi pujan of the first IT Park in Solapur on Sunday)

सोलापूर शहराजवळ असणाऱ्या डोणगाव रस्त्यालगत सुमारे ६५ एकर जागेत हा आयटी पार्क होणार आहे. त्यात आर्यन्स समूहाच्या माध्यमातून सुमारे ८०० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. माजी महापौर कोठे आणि आर्यन्स ग्रुपचे मनोहर जगताप यांनी याबाबतची माहिती प्रसार माध्यमांना दिली.

गेल्या काही वर्षांपासून महेश कोठे हे सोलापुरात आयटी पार्क व्हावा, यासाठी पाठपुरावा करत होते. मात्र, त्या प्रयत्नांना यश नव्हते. या आयटी पार्कसाठी मी पक्षही सोडला, असे कोठे हे नेहमी सांगत असतात. मात्र, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळे सोलापुरात आयटी पार्क होत आहे,त्याचे मोठे समाधान आहे. या उद्योगाच्या माध्यमातून सोलापूरच्या विकासाला चालना मिळेल, त्यातून आर्थिक आणि रोजगाराच्या संधी वाढत जातील, अशी अपेक्षाही महेश कोठे यांनी व्यक्त केली.

दरम्यान, या आयटी पार्कमध्ये डेटा सेंटर, सर्च इंजिन निर्मिती, तसे रोबोट निर्मिती होणार आहे. तसेच, आयटीशी संबंधित कंपन्यांचा समावेश असणार आहे. या पार्कमध्ये तब्बल १० हजार लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. या आयटी पार्कचे प्रत्यक्ष कामकाज मार्च २०२४ पासून सुरू होणार आहे. तांत्रिक शिक्षण घेतलेल्या दीड हजार तरुणांना पहिल्या टप्प्यात, तर नॉन टेक्निकल तीन हजार तरुणांच्या हाताला या उद्योगाच्या माध्यमातून काम मिळणार आहे.

आयटी पार्कच्या भूमिपूजन कार्यक्रमाला पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पंचशील ग्रुपचे अतुल चोरडिया, मगरपट्टा सिटीचे सतीश मगर, आर्यन ग्रुपचे चेअरमन मुकुंद जगताप, आर्यन ग्रुपच्या कार्यकारी संचालक स्मिता जगताप हे उपस्थित राहणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT