Nagar Politics : आठवलेंना शिर्डी सुटली तर लोखंडे श्रीरामपूरवर दावा करणार; मुलाच्या उमेदवारीसाठी फिल्डिंग

Mahayvuti News : आठवले यांना पुन्हा शिर्डीतून उमेदवारी मिळाली तरी शिवसेनेचे (शिंदे गट) विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उमेदवारीचे काय असा प्रश्न आहे.
Ramdas Athawale, Sadashiv Lokhande
Ramdas Athawale, Sadashiv Lokhande Sarkarnama
Published on
Updated on

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे मोठ्या गुंतागुंतीची झाली आहेत. त्यातच नगरचे राजकारण मोठे मजेशीर आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिर्डी या राखीव मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. महायुतीकडून त्यांची उमेदवारी पक्की ठरली तर विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांची गोची होणार आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी श्रीरामपूर विधानसभा या राखीव मतदारसंघातून मुलासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. (If Shirdi is released to Athavale, Lokhande will claim Srirampur)

राज्यात २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी असे सरळधोपट राजकारण सुरू होते. मात्र, मुख्यमंत्रिपदावरून निर्माण झालेल्या तिढ्यामुळे शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आली आणि महाविकास आघाडी सत्तेवर आली. अडीच वर्षे सत्ता भोगल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक गट शिवसेनेतून फुटून बाहेर पडला. त्यानंतर मागील महिनाभरात राष्ट्रवादीतही उभी फूट पडली.

Ramdas Athawale, Sadashiv Lokhande
Relief to Tope, Gorantyal : राजेश टोपे, कैलास गोरंट्याल यांना दिलासा; मतदारसंघामधील विकास कामांवरील स्थगिती सरकारने उठवली

शिवसेना, राष्ट्रवादीतील फुटीचे नगर जिल्ह्यांतही पडसाद उमटले आहेत. शिर्डी लोकसभाबाबत सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यातून मतदारसंघ बदलाची चर्चा सुरू आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला शिर्डी लोकसभा आणि श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात या आट्या-पाट्याचा राजकीय खेळ गृहीत धरला जात असून येणाऱ्या बातम्या आणि वक्तव्ये याची पृष्ठी करताना दिसून येत आहे.

Ramdas Athawale, Sadashiv Lokhande
Flag Hoisting Program : ना अजितदादांची...ना चंद्रकांतदादांची.... पुण्यात दादागिरी राज्यपालांची...

रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिर्डी लोकसभेसाठी आग्रह धरला आहे. आठवले यांना पुन्हा शिर्डीतून उमेदवारी मिळाली तरी शिवसेनेचे (शिंदे गट) विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उमेदवारीचे काय असा प्रश्न आहे. भारत राष्ट्र समितीमध्ये गेलेले माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या निवासस्थानी भोजनाच्यानिमित्ताने लोखंडे यांनी नुकतीच बीआरएसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. या भेटीनंतर खासदार लोखंडे आपले पुत्र डॉ. चेतन लोखंडे यांच्या श्रीरामपूर राखीवमधून उमेदवारीसाठी प्रयत्नात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Ramdas Athawale, Sadashiv Lokhande
Beed Politics : जयदत्त क्षीरसागरांचा आणखी एक पुतण्या राष्ट्रवादीत येणार; दोन भावांमध्ये लढत होण्याची शक्यता

श्रीरामपूर राखीव मतदारसंघ असल्याने बीआरएसमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार भानुदास मुरकुटे नेवासे मतदारसंघातून विधानसभा लढवणार का, याचीही चर्चा सुरू झाली आहे. यातील सर्व नेते स्वतः सध्या आपली भूमिका स्पष्ट न करता आपापल्या पक्षांच्या ध्येयधोरणांमध्ये कार्यरत आहेत. मात्र, राजकीय विश्लेषक २०२४ च्या लोकसभा आणि नंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय गणिते मांडत आहेत. दरम्यान माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com