Sharad Pawar, Dilip Walse Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar News : ज्यांचं जाणं जिव्हारी लागलं त्यांच्याच बालेकिल्ल्यात शरद पवारांचा पहिला घाव...!

NCP Political News : '' अजित पवार कुणी परके नव्हते, एकत्र काम केल्यानंतरही...''

सरकारनामा ब्यूरो

Karad : अजित पवारांसह नऊ आमदार शिंदे फडणवीस सरकारसोबत सहभागी झाले आहेत. यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. ज्यांना शरद पवारांची सावली, निष्ठावान समजलं जायचं त्या प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ या नेतेमंडळींनीही त्यांची साथ सोडली. याचदरम्यान ,आता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी प्रीतीसंगमावरुनच पक्षातील बंडखोरीच्या संकटाचं आव्हानाला परतवून लावण्यासाठी रणशिंग फुंकलं आहे.

शरद पवार यांनी रविवारी(दि.2) अजित पवारांसह नऊ मंत्र्यांनी भाजपा शिवसेना युती सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. याचवेळी दिलीप वळसे पाटलां(Dilip Walse Patil)चं अजित पवारांसोबत जाणं त्यांच्या चांगलंच जिव्हारी लागलं आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी प्रितीसंगमावर जाऊन पुन्हा एकदा पक्षबांधणीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचवेळी त्यांनी राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली आहे. तसेच ज्यांचं जाणं पवारांच्या जिव्हारी लागलं त्यांच्याच मतदारसंघात पहिली सभा जुन्नरमध्ये घेण्याची घोषणा केली आहे.

शरद पवार(Sharad Pawar) हे राज्यव्यापी दौरा करताना पहिलीच सभा अजित पवारांसोबत गेलेल्या व मंत्रिपदाची शपथ घेतली त्यांच्या दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात होणार आहे. त्यानंतर बीडमधील परळीला धनंजय मुंडेंच्या मतदारसंघात दुसरी सभा होणार आहे. याचवेळी अजित पवार कुणी परके नव्हते, एकत्र काम केल्यानंतरही मतभिन्नता असते. त्यामुळे त्यांच्याविषयी संशय व्यक्त करणार नाही असेही पवार यांनी नमूद केले.

पवार नेमकं काय म्हणाले..?

एखादी महत्वाची मोहीम सुरू करण्यासाठी गुरूपौर्णिमा हा चांगला दिवस असतो. म्हणून यशवंतरावांच्या स्मृतींना वंदन करून मी ही मोहीम सुरू केली. भाजपच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नातून राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होता. सामाजिक सलोख्यासाठी प्रयत्न ही आमची अपेक्षा होती. ज्या प्रवृत्तींशी आमचा संघर्ष आहे, त्यांच्यासोबत गेल्याचं मतही पवार यावेळी म्हणाले.

अजित पवार कुणी परके नव्हते...

तसेच अजित पवार(Ajit Pawar) कुणी परके नव्हते, एकत्र काम केल्यानंतरही मतभिन्नता असते. त्यामुळे त्यांच्याविषयी संशय व्यक्त करणार नाही. पण मी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी मी पुढाकार घेतला आहे. आमचे अनेक सहकारी ज्यांना हजारो कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला, ज्यांच्याकडून संघटन मजबूत करावी अशी अपेक्षा होती.

शरद पवार यांनी यावेळी सांगितलं की, कोणताही संभ्रम नको, म्हणून जाहीरपणे पक्षबांधणीसाठी जात आहे. मात्र, काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे नव्या पिढीतील कार्यकर्ता नाऊमेद होऊ नये म्हणून मी हा दौऱा सुरू केला आहे. कार्यकर्ते आणि त्यातीलही 70-80 टक्के तरूण आमच्या पाठीशी आहेत हे चित्र आहे.

राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेवर नार्वेकर काय म्हणाले..?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पाठवलेल्या अपात्रतेच्या कारवाईसंबंधीच्या याचिकेवर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, "विधानसभेचे सदस्य जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 9 आमदारांविरुद्ध अपात्रतेची याचिका सादर केलेली आहे. ती मी वाचून घेऊन. त्यात नमूद केलेल्या मुद्द्यांचा अभ्यास करून योग्य निर्णय घेतला जाईल.

सभागृहातील विरोधी पक्षनेत्याच्या निवडीचा निर्णय सभापती घेतात.यावर निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे. त्यामुळे विधानसभेच्या नियमांनुसार सर्व घटनात्मक तरतुदी लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घेणे आवश्यक असेल असंही नार्वेकर म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT