Sharad Pawar, Shahu Maharaj Chhatrapati sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur NCP News : शरद पवारांची खेळी; 'मविआ'कडून शाहू महाराज छत्रपती रिंगणात उतरणार..?

Umesh Bambare-Patil

Kolhapur Political News : राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या फुटी नंतर पुन्हा पक्ष बांधणीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कंबर कसलेली आहे. त्यांनी संपूर्ण राज्याचा दौरा सुरू केलेला आहे. या दौऱ्यांमध्ये कोल्हापुरातील सभेचं अध्यक्षस्थान थेट शाहू महाराज यांनी स्वीकारलेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून येणाऱ्या लोकसभेला राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून शाहू महाराज यांना संधी मिळणार का ? अशी चर्चा काेल्हापूरात रंगली आहे.

संपूर्ण देशाला लोकसभा निवडणुकीचे वेध लागलेले असतानाच राष्ट्रवादीत फूट पडली. राष्ट्रवादीला पुन्हा सावरण्यासाठी शरद पवार यांनी महाराष्ट्राचा झंजावात दौरा सुरू केलेला आहे. येत्या शुक्रवारी (ता. 25) कोल्हापुरात शरद पवार Sharad Pawar यांची जाहीर सभा होत आहे. या सभेचं अध्यक्षस्थान थेट श्रीमंत छत्रपती शाहू महाराज Shahu Maharaj Chhatrapati यांनी स्वीकारले आहे.

यातून त्यांनी आगामी राजकीय दिशाच स्पष्ट केल्याचं दिसून येत आहे. या पूर्वीच अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी भाजपवर थेट हल्लाबोल केला होता. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे नेते कोल्हापुरातून त्यांच्या उमेदवारी साठी प्रयत्न करत असताना महाराजांच्या भूमिकेने आघाडीच्या नेत्यांच्या प्रयत्नाला यश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

छत्रपती घराण्याशी ऋणानुबंध

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवार हे राज्यात ठिकठिकाणी सभा घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांची २५ ऑगस्टला कोल्हापुरात जाहीर सभा होत आहे. पवार आणि छत्रपती घराण्याचे अतिशय चांगले संबंध आहेत. राष्ट्रवादीच्या राजकीय सभेचे अध्यक्षपद स्वीकारत त्यांनी महाविकास आघाडीच्या प्रयत्नाला बळ दिल्याचं बोललं जात आहे.

शिंदे गट, भाजप आणि अजित पवार यांच्या गटाकडून इच्छुक म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक आणि अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांची नावे चर्चेत आहेत. या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांची उमेदवारी निश्चित झाल्यास महाविकास आघाडीची उमेदवारी प्रबळ होणार आहे.

महाराजांनी महाविकास आघाडीची उमेदवारी घेतल्यास आघाडीला अतिशय प्रबळ उमेदवार मिळणार आहे. त्याचाही मोठा फायदा आघाडीला होणार आहे. यामुळे ते उमेदवार असावेत म्हणून पवारांनीच फिल्डींग लावली आहे. पहिल्या टप्प्यात त्यांच्या या प्रयत्नाला यश आल्याचे समजते. यामुळे महाराज राष्ट्रवादीच्या जाहीर सभेला येणार आहेत असे झाल्यास भाजपला मात्र तगडा उमेदवार मिळविण्यासाठी चांगलीच धावपळ करावी लागणार हे मात्र निश्चित.

या नावांचीही चर्चा....

महाविकास आघाडीच्या वतीने लोकसभेसाठी खालील उमेदवारांच्या नावांची चर्चा आहे काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील, काँग्रेसकडून आमदार सतेज पाटील, बाजीराव खाडे, राष्ट्रवादीचे माजी आमदार के.पी. पाटील, शिवसेनेचे संजय घाटगे, राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, दरम्यान यातील काहीजण इच्छुक नसल्याचेही समजते.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT