Kolhapur Politics : एकमेकांविरोधात दंड थोपटणारे पक्के राजकीय वैरी एकाच मंचावर; कोल्हापूर पॅटर्नची चर्चा..

Dhananjay Mahadik VS Rituraj Patil News : राजकारणामध्ये मनभेद, मतभेद असतात. परंतु..
Dhananjay Mahadik VS Rituraj Patil News
Dhananjay Mahadik VS Rituraj Patil NewsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Politics News : गोकुळ शिरगाव 'एमआयडीसी'मध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात खासदार धनंजय महाडिक आणि आमदार ऋतुराज पाटील एकमेकांचे कट्टर विरोधक एकाच व्यासपीठावर होते. यावेळी ऋतुराज पाटील यांनी 'एमआयडीसीत फायर ब्रिगेडची मागणी केली. त्यावर उदय सामंत यांनी आपल्या भाषणात फायर ब्रिगेड देतो, पण त्याचा वापर महाडिक आणि पाटील वाद शांत करण्यासाठीही करा, असं वक्तव्य केल्यानंतर व्यासपीठावरील महाडिक आणि पाटील यांच्यासह सर्वजण खळखळून हसले. (Latest Marathi News)

Dhananjay Mahadik VS Rituraj Patil News
Kolhapur-Satara Politics: राष्ट्रवादीतील फुटीमुळे कोल्हापूर, सातारा लोकसभा मतदारसंघाची समीकरणं बदलणार?

गोकुळ शिरगाव एमआयडीसीमधील विकासकामांच्या भूमिपूजनावेळी खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, आमदार ऋतुराज पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमात राजकीय टोलेबाजी रंगली. आमदार ऋतुराज पाटील यांनी गोकुळ शिरगाव एमआयडीसीसाठी १३ कोटींच्या फायर स्टेशनला मंजुरी दिल्याबद्दल उद्योगमंत्री सामंत यांना धन्यवाद दिले. त्यावर नुसती प्रशासकीय मंजुरी देवून आम्ही थांबणार नाही. पुढील १५ दिवसांत निविदा काढून लवकरात लवकर फायर स्टेशनचे काम सुरू केले जाईल.

तसेच फायर स्टेशनची मागणी अतिशय योग्य असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. राजकीय आग उठल्यानंतर महाडिक आणि पाटील यांनी 'फायर ब्रिगेड'चा उपयोग करावा, असे त्या दोघांकडे पाहून आवाहन करताच कोल्हापुरात राजकीय आग उठल्यानंतर 'फायर ब्रिगेड'चा वापर करावा, असे खासदार धनंजय महाडिक आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडे पाहून सामंत यांनी आवाहन करताच उपस्थित सर्वामध्ये हास्य पसरले.

Dhananjay Mahadik VS Rituraj Patil News
PMC Garbage Scam : 'कचऱ्या'तून शेकडो कोटींची 'ठेकेदारी' करणारा पुण्यातला माजी आमदार कोण ?

सामंत म्हणाले, "मला आज मनापासून आनंद होत आहे की, राजकारणामध्ये मनभेद, मतभेद असतात. परंतु, एखाद्या कारणासाठी हे माझे काम आहे. माझ्या जिल्ह्यातील, मतदारसंघातील आणि माझ्या लोकांचे काम असल्याचे समजून सगळे हेवेदावे बाजूला ठेवून लोकप्रतिनिधी एकत्र येतात."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com