Satara CM News : मुख्यमंत्र्यांची जिल्हाधिकाऱ्यांना सूचना; महाबळेश्वर, कासला अनाधिकृत बांधकामे नकोत...

Eknath Shinde मुख्यमंत्री आज दरे गावाला निघाले असता खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर साताऱ्यातील सैनिक स्कुलच्या हेलिपॅडवर उतरविण्यात आले. यानंतर ते अल्पवेळ शासकिय विश्रामगृहात थांबले होते.
Jitendra Dudi, Eknath shinde
Jitendra Dudi, Eknath shindesarkarnama
Published on
Updated on

Satara CM News : महाबळेश्वर, पाचगणी,कास परिसरात अनाधिकृत बांधकामे होऊ नयेत, याबाबतची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात पर्यटन वाढविताना कोकणाशी साताऱ्याशी व पश्चिम महाराष्ट्राशी संपर्क वाढवली जाईल. तसेच येथील तरुणांना या भागातच रोजगार मिळण्यासाठी पर्यावरण पूरक पर्यटनाला प्राधान्य दिले जाणार आहे, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री Eknath Shinde आज दरे गावाला निघाले असता खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर साताऱ्यातील सैनिक स्कुलच्या हेलिपॅडवर उतरविण्यात आले. यानंतर ते अल्पवेळ शासकिय विश्रामगृहात थांबले होते.अधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक झाली. त्यानंतर दरे गावाकडे जाताना त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी आमदार मकरंद पाटील Makrand Patil , जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, तसेच अधिकारी उपस्थित होते.

महाबळेश्वर,पाचगणी, कास परिसरातील अनाधिकृत बांधकामांबाबत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाबळेश्वर, पाचगणी, कासच्या विषयी पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. या परिसरात अनाधिकृत बांधकामे होऊ नयेत अशी सक्त सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. महाबळेश्वर परिसरात पर्यटनाला आणखी कोठे वाव आहे, हे पाहून निर्णय घेतला जाईल.

तापोळ, बामणोली, वासोटा किल्ला या भागात पर्यटनाच्या दृष्टीने जे काही करता येईल ते केले जाईल. पर्यटन वाढवताना कोकणाशी साताऱ्याशी तसेच पश्चिम महाराष्ट्राशी कनेक्टीव्हीटी वाढवली जाणार आहे. क्लस्टर शेती, बांबू लागवड सारखे उपाय केले जातील. तसेच वनौषधीही मोठ्याप्रमाणात असून मुनावळेत स्कुबा डायव्हींगसाठी प्रयोग आहे.

Jitendra Dudi, Eknath shinde
Kolhapur-Satara Politics: राष्ट्रवादीतील फुटीमुळे कोल्हापूर, सातारा लोकसभा मतदारसंघाची समीकरणं बदलणार?

या भागातील तरुण वर्ग नोकरीसाठी मुंबईला गेला आहे. त्याला या भागातच रोजगार मिळण्यासाठी व पर्यावरणाची हानी होऊ नये याची काळजी घेत पर्यावरण पूरक पर्यटनाला वाव दिला जाणार आहे. पूर्वेकडील तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी होत आहे. याविषयी विचारले असता मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आमचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे त्यांनी नमुद केले.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com