Eknath Shinde Satej Patil And BJP Dhananjay Mahadik  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Eknath Shinde Politics : शिवसेनेचा गनिमीगेम! निशाणा सतेज पाटलांवर अन् शिकार मुन्ना महाडिकांची

Shivsena Vs Satej Patil And BJP Dhananjay Mahadik : काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांच्यासह जवळपास 24 माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यात दोन माजी महापौर आणि एका उपमहापौराचा समावेश होता. तर प्रवेश केलेल्यांमध्ये भाजपसह ताराराणीचेही काही नेते होते.

Rahul Gadkar

Kolhapur News : काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांना हा धक्का समजला जातोय. वास्तविक गेल्या महिनाभरापासून सतेज पाटलांना धक्का देणार असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता. मात्र शिवसेनेने सतेज पाटील आणि त्यांच्या गटावर रोख धरत राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आणि त्यांच्याच गटाची शिकार केली आहे. तब्बल एक दोन नव्हे तर भाजप, ताराराणी आघाडीचे 11 नगरसेवक गळाला लावले आहेत. तसेच काँग्रेसमधील माजी आमदार मालोजीराजे गटाचे नगरसेवक सर्वाधिक असून सतेज पाटील यांची केवळ तीनच नगरसेवकांनी साथ सोडली आहे.

शिवसेनेत पक्षप्रवेश केलेले सर्वाधिक नगरसेवक हे भाजप ताराराणी आघाडी आणि राष्ट्रवादीतील आहेत. 22 पैकी 14 नगरसेवक हे महायुतीतील आहेत. त्यामुळे उमेदवारी मिळवत असताना महायुतीतील सर्वच पक्षांसमोर मोठे आव्हान असणार आहे. शिवाय जागावाटप करत असताना नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळातही पक्षांतर कोलांट्या उड्या झाल्या तर नवल वाटायला नको.

शिवसेनेत पक्षप्रवेश केलेले काँग्रेसचे सात नगरसेवक आहेत. त्यामध्ये शारंगधर देशमुख, रीना कांबळे, प्रकाश नाईकनवरे, प्रतिभा नाईकनवरे, निलोफर आजरेकर, दिगंबर फराकटे, जहांगर पंडित, ताराराणी आघाडीचे सुनील कदम, अर्चना पागल, सीमा कदम, कविता माने, सुनंदा माने, पूजा नाईकनवरे, भरत लोखंडे या सात जणांचा समावेश आहे. तर भाजपमधील गीता गुरव, संभाजी जाधव, अश्विनी बारामते, संगीता सावंत तर राष्ट्रवादीतील आनंदराव खेडकर अनुराधा खेडकर आणि रशीद बारगीर या तिघांचा समावेश आहे. मात्र यातील काही लोक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सोबत राहिले होते.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने त्याची जबाबदारी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्यावर सोपवली आहे. त्यामुळे भाजप आणि ताराराणी आघाडीतील जवळपास 11 नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्याने पहिल्याच टप्प्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे.

पण काँग्रेसला सर्वाधिक मोठा धक्का देण्याच्या तयारीत असणाऱ्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चाहूल लागताच काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी सावध पवित्रा घेतला होता. त्यांनी काँग्रेस नगरसेवकांना एकत्र केले होते. तसेच देशमुख यांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवली होते. यामुळे या प्रवेशावेळी केवळ तीनच माजी नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT