Hasan Mushrif Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hasan Mushrif : शौमिका महाडिकांचा मोर्चा मुश्रीफांच्या जिव्हारी..!

Hasan Mushrif controversy : फरकातील रक्कम कपात केल्यानंतर काल संस्थाचालकांनी गोकुळ दूध संघावर गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला.

Rahul Gadkar

फरकातील रक्कम कपात केल्यानंतर काल संस्थाचालकांनी गोकुळ दूध संघावर गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. मात्र हा मोर्चा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. काल गोकुळ दूध संघावर आलेला मोर्चा हा आमच्या काळजाला ठेच लागणार आहे. अशा शब्दात मंत्री मुश्रीफ यांनी खंत व्यक्त केली आहे.

दरम्यान डिबेंचर जो वाद सुरू आहे त्यावर निर्णय देताना त्यावर तोडगा काढत दिवाळीच्या तोंडावर दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगलीच घोषणा केली. म्हैस दूध उत्पादक शेतकऱ्यांना आणि गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर एक रुपयांची खरेदी दरवाढ देण्यात आली. शिवाय संस्थांना व्यवस्थापनाच्या खर्चासाठी दहा पैशाची वाढ करण्यात आली. 1 ऑक्टोबरपासून ही दरवाढ केली असल्याची घोषणा मंत्री मुश्रीफ यांनी केली.

सत्ता आल्यापासून 15 रुपये दरवाढ केली आहे. पशुखाद्यात 50 रुपये दर कमी केला. ज्यांनी 32 वर्षे सत्ता ठेवली, त्यांच्या सुनबाई कालच्या मोर्चाचें नेतृत्व केलं. आपण सत्तेत असताना डिबेंचर सुरू केले त्यांनी डिबेंचरला विरोध करतात ही भूमिका योग्य नाही. काल गोकुळमध्ये जो मोर्चा निघाला तो आमच्या काळजाला ठेच लागली असल्याची खंत मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केली.

डिबेंचरचा अभ्यास करा आणि शेतकऱ्यांची भूमिका जाणून घ्या. त्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल. विनाकारण गैरसमज होईल असं करू नका.पुढच्या वेळी डिबेंचरचा मुद्दा येणार नाही याची काळजी घ्या. अशा सूचना देखील मंत्री मुश्रीफ यांनी केल्या.

बंटी पाटील माझं ऐकत नाही

बंटी पाटलांना माझ्या शुभेच्छा, मी नेहमी त्यांना सांगतो ते माझं ऐकत नाही. ते नेहमीच सोयीस्कर भूमिका घेतात. गोकुळचा कारभार चांगला सुरू आहे. डिबेंचरचा मुद्दा समजून सांगितला असता तर दूध उत्पादकांनी मान्य केले असते. मुंबईतील जागा घेणार या पैशातून घेणार असल्याचे सांगितले असते आणि जनरल सभेला हा मुद्दा ठेवला असता तर बरं झालं असतं आणि काल मोर्चा आला नसता, असे आमदार चंद्रदीप नरके म्हणाले.

SCROLL FOR NEXT