Shekhar gore -Jaykumar gore Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gore Brother : शेखर गोरेंचा सातारा जिल्हा बॅंकेसाठी पुन्हा शड्डू; मंत्री जयकुमार गोरेंची एन्ट्री पुन्हा हुकणार?

Satara Dcc Bank Election 2026 : सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी मतदारांचे ठराव पूर्ण झाले असून नेत्यांमध्ये दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. शेखर गोरे यांच्या उमेदवारीच्या निर्णयामुळे जयकुमार गोरे यांच्यासमोर राजकीय अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.

सरकारनामा ब्यूरो

Satara, 16 August : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणूक प्रक्रियेला आता वेग आला असून जिल्ह्यातील मतदारांचे ठराव घेण्याचे काम पूर्ण झाले आहे. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी आता नेतेमंडळींकडूनही दावे-प्रतिदावे केले जात आहेत. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांनीही जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी पुन्हा शड्डू ठोकला आहे, त्यामुळे मंत्री जयकुमार गोरेंचीच अडचण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी २०१२ ठराव झाले आहेत. भाजप नेत्यांनी जिल्हा परिषदेनंतर आता जिल्हा बॅंकही ताब्यात घेण्याचा चंग बांधला आहे. पण नव्या बॅंकिंग नियमांमुळे मंत्री शिवेंद्रराजे, उदयनराजे, रामराजे यांच्यासह १० दिग्गजांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. पण, मंत्री जयकुमार गोरे, शंभूराज देसाई आणि मकरंदआबा पाटील या मंत्र्यांना बॅंकेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणार आहे.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हेही जिल्हा बॅंकेवर जाण्यासाठी इच्छूक आहेत. मात्र, त्यांचे बंधू शेखर गोरे यांनी पुन्हा एकदा जिल्हा बॅंकेची निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे आपल्यामुळे अनेकांनी गुलाल उधळला आहे. आता जिल्हा बॅंकेची निवडणूक मी स्वतः ताकदीने लढणार आहे, असे शेखर गोरे यांनी स्पष्ट केले आहे.

शेखर गोरे हे सोसायटी मतदारसंघातून पुन्हा नशीब अजमावण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्याच माण खटावचे आमदार जयकुमार गोरे हे कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढविणार, याची उत्सुकता आहे. कारण शेखर गोरे यांनी मागील निवडणुकीत सर्वच पक्षाचे लोक विरोधात असतानाही निवडणूक जिंकली होती, त्यामुळे त्यांचा कॉफिन्डन्स वाढलेला आहे. त्यामुळे मंत्री जयकुमार गोरे यांच्यासाठी शेखर गोरे माघार घेणार की मंत्री गोरे हे इतर कुठल्या मतदारसंघाची निवड करणार, याकडे साताऱ्याचे लक्ष असणार आहे.

विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या चर्चेनंतर शेखर गोरे यांनी माण खटावमधून माघार घेतली होती. त्यावेळी त्यांना आमदारकीचा शब्द दिल्याची चर्चा होती. त्यामुळेच त्यांनी विधान परिषद निवडणुकीवेळी इच्छा बोलून दाखवली होती. मात्र, जयकुमार गोरे यांनी आपल्या बंधूऐवजी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांना तिकिट मिळवून देत विजयाचा गुलाल उधळला हेाता. त्यामुळे शेखर गोरेंची घोषणा जयकुमार गोरेंची अडचण वाढविण्याची शक्यता आहे. त्यावर मंत्री गोरे काय तोडगा काढतात, हे पाहावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT