Solapur News : सोलापुरात 700 कुटुंबांचा वहिवाटीचा रस्ता खोदला; खासदार प्रणिती शिंदेंसह नागरिकांचा 4 तास ठिय्या

Praniti Shinde Protest : सोलापूरच्या बॉम्बे पार्कजवळील गणेश बिल्डिंग परिसरातील रस्ता खोदल्याने 700 कुटुंबांची गैरसोय झाली. खासदार प्रणिती शिंदे आणि नागरिकांनी चार तासांहून अधिक काळ खड्ड्यात ठिय्या आंदोलन केले.
praniti shinde
praniti shindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 16 August (प्रकाश सनपूरकर) : सोलापूर शहरातील बॉम्बे पार्क जवळील गणेश बिल्डींग परिसरातील ७०० कुटुंबांचा ये-जा करण्याचा मुख्य रस्ता खोदण्यात आला आहे. वहिवाटीचा रस्ता बंद झाल्याने खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह येथील नागरिकांनी तब्बल चार तासांपेक्षा जास्त काळ खड्ड्यात ठिय्या आंदोलन केले. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी चार तासांनंतर नगररचा अधिकाऱ्यास रस्ता शोधण्यास पाठवले. पण तोही खड्ड्यात अडकला, त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत हा वाद सुरुच होता.

बॉम्बे पार्क रस्त्यावर १९८४ मध्ये गणेश बिल्डरकडून ज्ञानेश्वर नगर स्कीम नंबर ३ विकसित करण्यात आली आहे. या वसाहतीमध्ये ७०० ते ८०० नागरिक राहतात. या नागरिकांना बॉम्बे पार्क रस्त्याला जोडलेला एकमेव वहिवाटीचा रस्ता आहे. मात्र हा रस्ता लगतच्या लेआउटधारकाने खोदला आहे. त्यामुळे नागरिकांना वहिवाट करणे मुश्कील झाले आहे.

या रस्त्याच्या प्रश्नासंदर्भात येथील नागरिकांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. तेव्हा महापालिका व लोकप्रतिनिधीनींनी हा प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर सोसायटीच्या अध्यक्षा ॲड. निता जोशी यांनी न्यायालयात धाव घेतली.

प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही बाजूच्या बांधकामधारकाने उरलासुरला रस्ता खोदून त्यांची ये-जा करण्याची वाट बंद केली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी बांधकाम खोदकाम जागेत ठिय्या मांडला. खासदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनीही आंदोलनात सहभाग घेतला.

praniti shinde
Andhare Vs Gore : सुषमा अंधारेंचा गोरेंवर पलटवार : ‘जयकुमार, तुमच्याकडे मोठ्या बहिणीशी याच भाषेत बोलतात का?’

झोनल अधिकारी, नगरसेवक यापैकी कोणीही जबाबदार लोकप्रतिनिधी रस्ता खोदलेल्या ठिकाणी आलेच नाहीत. आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी तीन ते चार तासांनी नागरिकांशी संपर्क साधून नगररचना अधिकाऱ्यास आंदोलनस्थळी पाठवले.

प्रकरण न्यायप्रविष्ट असून नागरिकांनी सध्या जो वहिवाटीचा रस्ता आहे, तो वापरावा असे या अधिकाऱ्याने सांगितले. नागरिकांनी त्यांना पूर्ण खोदून टाकलेला रस्ता दाखवला, तेव्हा अधिकाऱ्यांची बोलतीच बंद झाली. न्याय प्रविष्ट प्रकरण आहे, तर रस्ता खोदायला न्यायालयाने परवानगी दिली होती का, अशी विचारणा नागरिकांनी केली. सायंकाळी उशिरापर्यंत नागरिक खड्डयात बसून होते.

praniti shinde
Karmala Politic's : 140 कोटींचे कर्ज मिळवूनही मकाई साखर कारखाना का चालवता येईना? : माजी अध्यक्षांचा हल्लाबोल

महापालिका सभेत दाद मागू : नगरसेवक

याबाबत या प्रभागाचे नगरसेवक दीपक जमादार म्हणाले, रस्ता खोदाई प्रकरणाची माहिती मिळाली असून तेथील नागरिकांची अडचण सोडवण्यासाठी आपण स्वतः महापालिकेच्या आगामी सभेत दाद मागून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com