Eknath Shinde and Maratha Reservation Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation : मराठा आरक्षण रद्द करण्यासाठी महाविकास आघाडी कोर्टात गेली, एकनाथ शिंदेंचा घणाघात

Eknath Shinde On Mahavikas Aghadi : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथे करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतले.

Rahul Gadkar

Kolhapur News : विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला यश मिळाल्यानंतर राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात आभार मेळावा घेतला जाणार आहे. यादरम्यान आज जालन्यात होणाऱ्या पहिल्या मेळाव्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. यावेळी बोलताना त्यांनी, मराठा समाजाबद्दल सरकारची जी भूमिका जी पहिल्यांदा होती तिच आजही असल्याचे म्हणत महाविकास आघाडीवर जोरादार टीका केली.

युती सरकारने त्यावेळी निर्णय घेतला होता, माझ्या काळात ही दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. पण आम्ही दिलेलं आरक्षण महाविकास आघाडी कोर्टात टिकवू शकली नाही. आम्ही मराठा समाजासोबत आहोत, त्यांच्या योजना कायम सुरू राहतील. मराठा आरक्षण रद्द व्हावे म्हणून महाविकास आघाडी मधीलच काही लोक कोर्टात गेले हे दुर्दैव असल्याचा घणाघात शिंदे यांनी यावेळी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय यांच्या मार्गदर्शनाखाली दावोसमध्ये यंदा विक्रमी करारनामे झालेले आहेत. पंधरा लाख करोड पेक्षा जास्त करारनामे झाले आहेत. लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे. मात्र विरोधकांना चांगले झालेलं बघवत नाही. मी ज्यावेळी दावोस गेलो त्यावेळी साडे सात लाख कोटींची करानामें झाले होते.

त्यातील 70 टक्के करारांची अंमलबजावणी झाली आहे. याआधी करारनामे कसे व्हायचे हे तुम्हाला माहिती आहे. एकूण परदेशी गुंतवणूकीपैकी 52 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आहे. त्यामुळे राज्य इंडस्ट्री फ्रेंडली झालंय. उद्योग आणि उद्योजक आकर्षित होतायत, लोकांना काम मिळतंय. हे विरोधकांना बघवत नाही. आपण कामातून टिकेला उत्तर देतो, असा पलटवार शिंदे यांनी केला आहे.

राज्यात झालेल्या एसटीच्या भाडेदरवाढीवर बोलताना, एसटीतून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, प्रवाशांचे हाल होणार नाही याची काळजी हे सरकार घेत आहे. तर पात्र लाडक्या बहिणीची योजना अशीच चालू राहणार असून त्यात खंड पडणार नसल्याचेही स्पष्टीकरण शिंदे यांनी दिलं आहे.

आज राज्यभरात पार पडलेल्या काँग्रेसच्या आंदोलनावर देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडकून टीका केली. निवडूण आलं की विरोधकांना ईव्हीएम चांगला असतो. निवडणूक आयोग चांगला असतो. विजय मिळतो त्यावेळी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय चांगले असते.

पण आता विरोधकांना ईव्हीएम खराब, निवडणूक आयोग वाईट वाटतो. त्यांना आता आमच्यावर आरोप करण्याशिवाय धंदा आहे का? विरोधी पक्ष नेता मिळवण्यासाठी जेवढे आमदार लागते ते देखील त्यांना मिळवता आलेले नाहीत.

महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना जागा दाखवून दिली आहे. फिल्डवर काम करणाऱ्या शिलेदारांना विजयी केलं आहे. घरी बसवणाऱ्यांना कायमचं घरी बसवलंय असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT