Eknath Shinde: स्वबळाचा नारा देणाऱ्या ठाकरेंना शिंदेंनी डिवचले; म्हणाले, 'घरी बसून निवडणूक ...'

Political News : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मेळावा पार पडला.
Eknath Shinde
Eknath Shinde sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : तुम्ही सर्वांनी विश्वास दाखवला. साथ दिली. त्यामुळेच सामान्य शेतकऱ्याचा मुलगा राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला. बाळासाहेबांनी स्वाभिमान शिकवला. अडीच वर्षात मी किती वर्षाचं काम केलं त्याचं मोजमाप तुम्ही करा. गेल्या अडीच वर्षात राज्यात अनेक विकासकामे केली आहेत. जनतेसाठी या काळात वेगाने विकास कामे काली आहेत. त्यामुळे राज्यातील जनता महायुतीच्या पाठीशी ठामपणे राहिली. विधानसभा निवडणुकीत बाळासाहेबांचे विचार जपलो म्हणून विजयी झालो, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मेळावा पार पडला. वांद्रे कुर्ला संकुलात हा मेळावा पार पडला. शिवसेना शिंदे गटाकडून बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस 23 जानेवारी विजयोत्सव म्हणून साजरा केला जात आहे. नुकतंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही यावेळी जोरदार भाषण केले. बाळासाहेबांचा विचार आपण जिवापाड जपला. कधी सोडला नाही. त्यामुळे दणदणीत विजय आपल्याला मिळाला, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.

Eknath Shinde
Balasaheb Thackeray Today Birthday: महाराष्ट्राला मी महान बनवू शकतो!...हे सारं घडलं होतं बाळासाहेब ठाकरे या माणसामुळं!

बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, ते कधी विसरू नका, असे आव्हान त्यांनी केले. खुर्चीसाठी मी कधीच कासावीस झालो नाही. स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी मनगटात ताकद लागते. घरात बसून निवडणूक जिंकता येत नाही, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray)नाव न घेता केली. बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांची अवस्था सहन ही होत नाही, अन सांगता येत नाही अशी झाली असल्याची टीका त्यांनी केली.

Eknath Shinde
Rohit Pawar Politics: रोहित पवार यांचा देवाभाऊंना चिमटा, कंपन्या शेजारी आणि करार दावोसला?

मी साधा कार्यकर्ता म्हणून काम करतो. आई भवानीच्या आशीर्वादाने सर्व काही मिळाले आहे. मला मुख्यमंत्रीपद मिळाले. जनतेची सेवा करता आली. जनतेच्या आयुष्यात बदल घडवता आला. त्यांचं जीवन सुखी करण्याची संधी मला मिळाली. राज्यातील बहिणींचा दोन कोटी ४० लाख बहिणींचा सख्खा भाऊ,लाडका भाऊ म्हणून अशी आपल्याला ओळख मिळाली. ही पदापेक्षा मोठी आहे. खुर्चीची लालसा कुणाला आहे? आपल्याला कधीच नव्हती असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

Eknath Shinde
Uday Samant : उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट, 10 तासांपूर्वीच विरोधी पक्षातील मोठा नेत्याचा देवेंद्र फडणवीसांना फोन

यावेळी बाळासाहेबांचा विचार आपण जिवापाड जपला. कधी सोडला नाही. त्यामुळे दणदणीत विजय आपल्याला मिळाला, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्याचवेळी बाळासाहेबांनी स्वाभिमान शिकवला. लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर. मी म्हणतो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आता देवेंद्र फडणवीस सीएम आहेत. मी डीसीएम आहे. डीसीएम म्हणजे डेडीकेटेड टू कॉमन मॅन, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Eknath Shinde
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंकडे शिवसेनेचं नेतृत्व देण्यासाठी हीच आहे का योग्य वेळ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com