MLA Jaykumar Gore sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara News : २०२४ ला पुन्हा भाजपचीच सत्ता येणार; माझ्यासहित चौघे आमदार होणार...

Jaykumar Gore रामराजेंनी केलेल्या टीकेवर बोलताना आमदार गोरे म्हणाले, म्हसवड कॉरिडॉर एमआयडीसीबाबत सत्ता नसताना ही आम्ही रामराजेंचे शहाणपण चालून दिले नाही.

Umesh Bambare-Patil

Jaykumar Gore News : सध्याच्या सरकारमधील १९ आमदारांचे निलंबन होईल, असे म्हणणारी ही मंडळी कुठल्यातरी आशेवर जगणारी असून त्यांना आमदारांच्या अपात्रतेची काळजी आहे. पण, शिंदे-फडणवीस यांचे सरकार आपला कार्यकाल पूर्ण करेल. तसेच २०२४ मध्येही पुन्हा भाजपचीच BJP सत्तेत येईल, असे भाकित आमदार जयकुमार गोरे Jaykumar Gore यांनी केले. तसेच माझ्यासहित चौघेही आमदार असतील. मैं जो बोला ओ, बोला.. असा हटके स्टाईलने डायलॉग मारला.

सातारा विश्रामगृहात आमदार गोरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका केली. रामराजेंनी केलेल्या टीकेवर बोलताना आमदार गोरे म्हणाले, म्हसवड कॉरिडॉर एमआयडीसीबाबत सत्ता नसताना ही आम्ही रामराजेंचे शहाणपण चालून दिले नाही. आता तर आमचीच सत्ता आहे. एमआयडीसीबाबत त्यांनी लोकांना भडकविण्याचा प्रयत्न केला.

एमआयडीसीवरुन राष्ट्रवादीतील दोन गट भांडत होते. एक गट कोरेगावसाठी प्रयत्न करत होता तर दुसरा गट म्हसवडला होण्यासाठी प्रयत्न करत होता. पण, आता कॉरिडॉर एमआयडीसी म्हसवडला होणार हे निश्चित असून केंद्रच्या टीमने पहाणी केलेली आहे. त्यामुळे निर्णय अंतिम आहे. रामराजेंच्या टीकेवर ते म्हणाले, संजय राऊतांनंतर आता त्यांचाच नंबर आहे.

शिंदे, फडणवीस सरकारमधील १९ आमदारांचे निलंबन होणार असे महाविकास आघाडीचे नेते सातत्याने सांगत आहेत. याविषयी विचारले असता आमदार गोरे म्हणाले, ही नेते मंडळी कुठल्यातरी आशेवर जगणारी माणसे आहेत. पण, शिंदे, फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार आपला कार्यकाल पूर्ण करेल. तसेच आगामी २०२४ च्या निवडणुकीत पुन्हा भाजपच सत्तेत येईल.

त्यानंतर शेजारी बसलेले मनोज घोरपडे, धैर्यशिल कदम यांचा हात हातात घेऊन तो उंचावत आम्ही चौघे आमदार होणार, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या शेजारी अतुल भोसलेही उपस्थित होते. यावेळी कोण कोणत्या मतदारसंघातून आमदार होणार, असे विचारले असता त्यांनी तसेच मै जो बोला ओ, बोला.. असा हटके स्टाईलने डायलॉग मारत अधिक बोलणे टाळले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT