Jaykumar Gore In Budget Session : डॉक्टरांचा सल्ला धुडकावत जयकुमार गोरे ‘वॉकर’च्या साहाय्याने पोचले अधिवेशनाला

Budget Session: अधिवेशन पुन्हा पुन्हा नसते. तब्येत सांभाळून मतदारसंघाचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम करणार आहे.
Jaykumar Gore
Jaykumar GoreSarkarnama

Mumbai News: मोठ्या अपघातातून बचावलेले भारतीय जनता पक्षाचे (BJP) माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) हे आज (ता. २७ फेब्रुवारी) अर्थसंकल्पीय (Budget) अधिवेशनासाठी ‘वॉकर’च्या साहाय्याने विधानमंडळात दाखल झाले. खरं तर डॉक्टरांच्या विश्रांतीचा सल्ला असूनही तो धुडकावून मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार गोरे अधिवेशनासाठी आले आहेत. (Jaykumar Gore, who survived major accident, reached Budget session with the help of a 'walker')

विधानभवनात आल्यानंतर आमदार जयकुमार गोरे म्हणाले की, मतदारसंघातील प्रश्न सोडवायचे आहेत. एवढ्या मोठ्या अपघातातून जनतेच्या आशीर्वादामुळे पुनर्जन्म मिळाला आहे. मतदारसंघाच्या कामासाठी व राज्यातील जनतेच्या विकास कामांसाठी अधिवेशनात माझा पुढाकार असणार आहे. माझ्या मतदारसंघातील कामे आघाडी सरकारने थांबवली होती. मात्र, आता नव्या सरकारमुळे ती कामे पुन्हा सुरू झाली आहेत. डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला आहे. पण अधिवेशन पुन्हा पुन्हा नसते. तब्येत सांभाळून मतदारसंघाचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम करणार आहे.

Jaykumar Gore
Marathwada News : उद्धव ठाकरेंच्या शिलेदारांनी प्रतिष्ठेच्या निवडणुकीत विजय खेचून आणला : मराठवाड्यात पुन्हा गड राखला

विधानभवनाच्या पायऱ्यापर्यंत नियमानुसार मोटार आणता येत नाही, त्यामुळे आमदार जयकुमार गोरे यांना वॉकरच्या साहाय्याने विधीमंडळात दाखल व्हावे लागले. डिसेंबरपासून गोरे हे रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांची तब्येत अजूनही पूर्वपदावर आलेले नाही. त्यानंतरही ते अधिवेशनासाठी विधीमंडळात आले आहेत.

Jaykumar Gore
Bandal On Adhalrao : आढळराव सगळे विसरून भेटायला आले; पण, ज्यांच्यासाठी केले ते मात्र विसरले : बांदलांचा खासदार कोल्हेंवर निशाणा

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या काळात सुटीच्या दिवशी मतदारसंघात परत येत असताना पुणे-पंढरपूर रस्त्यावर सातारा जिल्ह्यातील मलठण (ता. फलटण) येथे २४ डिसेंबर २०२२ रोजी अपघात झाला होता. बानगंगा नदीच्या पुलावरुन जयकुमार गोरे यांची गाडी सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळली होती. सुदैवाने या मोठ्या अपघातातून ते वाचले होते. या अपघातात गाडीतील दोघे गंभीर जखमी झाले होते, तर इतर दोघे किरकोळ जखमी झाले होते.

Jaykumar Gore
Solapur News : मोहिते-पाटील बँकेवर RBI चे निर्बंध; खातेदारांना पाच हजारापर्यंत रक्कम काढता येणार

आमदार जयकुमार गोरे हे नागपुरहून विमानाने पुण्यात दाखल झाले होते. पुण्यातून ते त्यांच्या फॉर्च्युनर मोटारीने पुण्याहून गावी दहिवडीकडे जात असताना २४ डिसेंबरच्या पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात झाला होता. अपघातात जखमी झालेल्या गोरे यांना पुण्यातील रुबी हॉल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com