Maan : जयकुमार गोरेंच्या प्रयत्नांना यश; कॉरिडॉर एमआयडीसी म्हसवड परिसरातच

Satara Collector जिल्हाधिकाऱ्यांना भूसंपादनाचे आदेश देण्यात आले आहेत. या भागात हजारो कोटींची गुंतवणूक होवून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असल्याने जनतेने आनंदोत्सव साजरा केला.
Jaykumar Gore, Uday Samant
Jaykumar Gore, Uday Samant sarkarnama

-विशाल गुंजवटे

Maan News : गेल्या काही महिन्यांपासून कळीचा मुद्दा ठरलेली मुंबई -बेंगलोर ग्रीन कॉरिडॉरअंतर्गत पाच हजार हेक्टर क्षेत्रावर होणारी औद्योगिक वसाहत अखेर म्हसवड परिसरातच होण्यावर शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले.माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे Jaykumar Gore यांच्या प्रयत्नाने उद्योगमंत्री उदय सामंत Uday Samant यांच्या विधानभवनातील दालनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र शासनाकडून तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला. दुष्काळी भागात एमआयडीसी होवून मोठ्याप्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात झालेल्या बैठकीला जयकुमार गोरे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव,सहसचिव संजय देगावकर,उप मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी पाटील, दत्ता मडकवार, राहुल भिंगारे, साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि प्रांत ऑनलाईन तसेच महाराष्ट्र राज्य औद्योगिक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सुरुवातीला सदर औद्योगिक वसाहत सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवर म्हसवड -धुळदेव परिसरात मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर याबाबत मोठे राजकारण घडले. म्हसवड परिसरात औद्योगिक वसाहतीला लागणारी जमीन उपलब्ध नाही, रस्ते नाहीत अशा अफवा उठवण्यात आल्या.राजकीय वजन वापरुन दिशाभूल करण्यात आली.

Jaykumar Gore, Uday Samant
Maan : माढा भाजपचा बालेकिल्ला असल्याचे दाखवून देणार.... जयकुमार गोरे

काही अधिकाऱ्यांना हाताशी धरुन तसा अहवालही वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात आला.सदर औद्योगिक वसाहत कोरेगाव तालुक्यात हलविण्याचा घाट घालण्यात आला. त्यानंतर काहींनी राजकीय पोळी भाजण्यासाठी आंदोलने केली.अनेक महिने जिल्ह्यात संभ्रमाचे वातावरण होते.

Jaykumar Gore, Uday Samant
Maan : जयकुमार गोरेंचे प्रयत्न; फडणवीसांनी माण-खटावला दिला छप्पर फाडके निधी...

आता मात्र, औद्योगिक वसाहत म्हसवड परिसरातच होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना भूसंपादनाचे आदेश देण्यात आले आहेत. या भागात हजारो कोटींची गुंतवणूक होवून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असल्याने जनतेने आनंदोत्सव साजरा केला.

Jaykumar Gore, Uday Samant
Satara News : नद्यांचे प्रदुषण वाढले; संवर्धनासाठी कोणते उपाय केले... श्रीनिवास पाटलांचा लोकसभेत आवाज

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com