Shirdi News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shirdi News: शिर्डीतील काँग्रेसचे शहराध्यक्ष अन् नगरसेवकावर प्राणघातक हल्ला; बाळासाहेब थोरात आक्रमक

Nagar Politics :चौघुले आणि आरने गंभीर जखमी

Pradeep Pendhare

Shirdi Crime News: शिर्डीचे काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चौघुले आणि नगरसेवक सुरेश आरने यांच्यावर लोणी (ता. राहाता) येथे दुचाकीवरून आलेल्या पाच ते सात जणांनी प्राणघातक हल्ला केला.

हे दोघे आश्वी बुद्रुक (ता. संगमनेर) येथे काल (मंगळवारी) झालेल्या शरद पवार यांचा आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. तेथून परताना लोणी (ता. राहाता) येथे हा हल्ला झाल्याने नगर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सचिन चौघुले आणि सुरेश आरने हे वाहनातून प्रवास करत होते. त्यांच्या वाहन दुचाकीवरून आलेल्या पाच ते सात जणांनी अडवले आणि त्यांच्यावर हल्ला केला. रॉडने मारहाण केली. या हल्ल्यात चौघुले यांच्या वाहनाची मोठी तोडफोड करण्यात आली आहे.

या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी लोणीतील घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. चौघुले आणि आरने हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना संगमनेरमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

राजकीय टीका टिपणी केल्यामुळे त्यांच्यावर हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सचिन चौघुले हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक आहेत. शिर्डी मतदारसंघात त्यांना विशेष स्थान आहे.

त्यामुळे त्यांना आश्वी येथे शरद पवार यांच्या आयोजित कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते त्यांच्या वाहनांतून परतीचा प्रवास करत होते. त्याच वेळी त्यांच्या वाहनाचा चार ते पाच दुचाकी पाठलाग करत होत्या.

चौघुले यांच्या वाहनाला गाड्या आडव्या झाल्यानंतर त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात चौघुलेसह त्यांच्याबरोबर असलेले नगरसेवक आरने गंभीर हे जखमी झाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष चौघुले आणि त्यांच्या शहराध्यक्षांवर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती समजताच आमदार बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी जखमींची भेट घेतली. बाळासाहेब थोरात यांनी आक्रमक पद्धतीने हल्लेखोरांचा समाचार घेतला. हे दहशतवादीचे राजकारण जनता खपवून घेणार नाही, असा इशारा थोरात यांनी दिला.

दहशतीचे राजकारण सहन करणार नाही थोरात

आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले, "सचिन चौघुले आणि त्यांच्या सहकारी यांच्यावर वाहनाला गाड्या अडव्या घालून हा प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. नेमके काय घडले आहे, त्याचा घटनाक्रम ते सांगतील. पाच ते सात जणांनी त्यांना प्रचंड मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांना फॅक्चर झाले आहे.

ही दहशतवादी पद्धतीने राजकारण करण्याची ही पद्धत आहे. शिर्डी मतदारसंघातील आणि महाराष्ट्रातील जनता हे दहशतवादी पद्धतीचे राजकारण सहन करणार आहे. या पद्धतीने जनता योग्यपद्धतीने उत्तर देतील. पोलिसांनी आता यात कडक कारवाई केली पाहिजे. निपक्षपाती पद्धतीची पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा आहे".

(Edited by: Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT