Shirdi Lok Sabha Constituency  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bhausaheb Kamble: शिर्डी लोकसभेसाठी भाऊसाहेब कांबळेंना ठोकला शड्डू!

Shirdi Lok Sabha Constituency Election 2024: कार्यकर्त्यांनी शिवसेनेकडून शिर्डी लोकसभा निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला आहे".

Pradeep Pendhare

Nagar Political News : दोन वेळा काँग्रेसकडून आमदार झालेले व २०१९ ला लोकसभा निवडणूक लढविणारे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पुन्हा एकदा शिर्डी लोकसभा लढविण्याच इच्छा व्यक्त केली.

मात्र, मातोश्रीचा आदेश आपल्याला बंधनकारक असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी अनुपस्थित असल्याने कांबळे यांनी मागितलेल्या उमेदवारीला बळ नेमके कोणाचे आहे हा चर्चेचा विषय ठरला.

श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृहावर माजी आमदार कांबळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेनेच्या ग्राहक संघटनेचे जिल्हा संघटक अशोक थोरे, तालुका संघटक संजय छल्लारे, विठ्ठलराव फरगडे, शेखर दुबैया, अतुल शेटे, विजय गव्हाणे, देविदास सोनवणे उपस्थित होते.

भाऊसाहेब कांबळे म्हणाले, "दोन वेळेस आपण श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. या कार्यकाळात अनेक विकासकामे केली आहे. त्यानंतर शिवसेनेकडून श्रीरामपूर विधानसभा व काँग्रेसकडून शिर्डी लोकसभा लढवली आहे. त्यात मी पराभूत झालो तरी मताधिक्य वाढलेलेच आहे.

गेल्या चार ते पाच वर्षांपासून शिवसेनेत एक शिवसैनिक म्हणून कार्य करत आहे. पुन्हा ग्रामीण व शहरी भागातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेकडून शिर्डी लोकसभा निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला आहे".

शिवसेना नेते उध्दव ठाकरे, संजय राऊत, विनायक राऊत आदी नेत्यांशीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. याबाबत मातोश्रीकडून जो आदेश प्राप्त होईल, जो उमेदवार दिला जाईल त्यांचे काम आम्ही करु, असेही भाऊसाहेब कांबळे यांनी म्हटले.

झोळीत हात घातल्यावर काय होते

आपली साईबाबांवर श्रद्धा आहे. नारायणगिरी महाराजांचा आपल्याला आशीर्वाद आहे. साईबाबांच्या झोळीत ज्यांनी हात घातले व ज्यांनी खोट्या शपथ घेतल्या, त्यांचे काय झाले हे सांगायची गरज नाही, अशी टिका भाऊसाहेब कांबळे यांनी कोणाचे नाव न घेता केला.

पत्रकार परिषदेचा निरोप नव्हता

शिवसेनेमध्ये उमेदवारी मागायची ही पद्धत नाही. ज्यावेळेस आपण स्वतः भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते, त्यावेळेस याच लोकांनी भाऊसाहेब कांबळे यांच्याविरुद्ध पत्रकार परिषद घेतली. त्या लोकांचे पुढे काय झाले आणि उमेदवारी कोणाला मिळाली हा इतिहास सर्वांना माहित आहे, असे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे यांनी सांगितले.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT