Kolhapur News : Uddhav Thackeray : Muralidhar Jadhav Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shiv Shena News : निष्ठावंत शिवसैनिक रडला, म्हणाला स्वतःवर गोळी झाडून....

Political News : .पक्षाने केलेली कारवाईमुळे मी पुरता खचून गेलो आहे. राजू शेट्टी यांनी गद्दारी केली. त्यांना तिकीट नको.

Rahul Gadkar

Kolhapur : शिवसेनेच्या (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी केल्यानंतर मुरलीधर जाधव आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. मीडियासमोर आपल्या अश्रूंना जाधव यांना रोखता आली नाही. त्यांनी आपल्या मनातील भावना बोलून दाखवली.

गेल्या 19 वर्षांपासून जिल्हाप्रमुख पदावर निष्ठावंत म्हणून काम करतो आहे. पक्षाने केलेली कारवाईमुळे मी पुरता खचून गेलो आहे.राजू शेट्टी यांनी गद्दारी केली. त्यांना तिकीट नको इतकंच माझं म्हणणं होतं. चुकीच्या गोष्टीला खतपाणी घालणार असाल तर माझ्यासारख्या शिवसैनिकाने केवळ गोळ्या घालून घ्यायचेच बाकी आहे, अशी भावना मुरलीधर जाधव यांनी व्यक्त केले.

मला पदावरून हटवण्यासाठी लोकसभा मतदारसंघातीलच माजी आमदार तसेच शिवसेनेच्या उपनेते सुषमा अंधारे, संपर्कप्रमुख अरुण दूधवाडकर यांचाच हात असल्याचा आरोप मुरलीधर जाधव यांनी यावेळी केला.

शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी केलेल्या मुरलीधर जाधव यांना अश्रू अनावर झाले. 19 वर्षे पक्षासाठी काम केलं पण मला पदावरून पायउतार केलं. माजी आमदार सुजित मिणचेकर हे पदमुक्त करण्यासाठी काम करत होते. गेल्या तीन महिन्यापासून मंचेकर हे मतदारसंघात मुरलीधर जाधव यांना दिवाळीनंतर पदमुक्त करणार असल्याचे सांगत आहेत, असा आरोपी मुरलीधर जाधव यांनी केला.

पक्षाशी गद्दारी करणारे तुम्हाला चालतात का? नवीन आलेल्या उपनेत्या यांचे आणि मिणचेकर यांचे चांगले संबंध असल्याने कारवाई करण्यात आलेचे सांगित. सुषमा अंधारे यांच्यावर देखील जाधव यांनी निशाना साधला.

भावना मीडियासमोर मांडल्या तर काय चूक केली? पक्ष संकटात असताना सगळ्यात जास्त प्रतिज्ञापत्र मी दिली. माझ्या मुलासह पत्नी आणि सगळ्यांची प्रतिज्ञापत्र सादर केली. अस असताना जर माझ्यावर कारवाई केली याचे दुःख वाटतं आहे. मला किमान बोलवून तरी चूक सांगायला पाहिजे होती. मी उद्धव ठाकरे किंवा पक्षाबद्दल काहीही वाईट बोलणार नाही. माझ्या पक्षाचे चिन्ह आणि नाव टिकू दे यासाठी दिवस रात्र काम केलं पण पक्षाने बडव्यांचा ऐकून माझ्यावर कारवाई केल्याचा आरोप जाधव यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिंदे गटात जाण्यासाठी दबाव

मी उदय सामंत यांना भेटलो पण उद्धव ठाकरे यांची परवानगी घेऊन भेटलो. मी शिंदे गटात गेलो नाही म्हणून माझा एमआयडीसी मधील एक कोटीचा प्लॅट काढून घेतला. मी पक्षासाठी नुकसान सहन केले. तरीही पक्षाने माझ्यावर अन्याय केला. एमआयडीसीमध्ये कोट्यवधींचा 67 एकराचा भूखंड घोटाळा आहे. त्यामध्ये माजी आमदार सुजित मिनचेकर यांची टोळी काम करते, असा आरोप देखील जाधव यांनी केला.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT