Kolhapur Political News : ठाकरे गटाच्या निष्ठावंताची खदखद अन् 'मातोश्री'वरुन आला हकालपट्टीचा आदेश...

Removal of Muralidhar Jadhav from the post of district head : ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि हातकणंगलेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्यावर राजू शेट्टी यांना विरोध केल्याने कारवाई
Uddhav Thackeray, Murlidhar Jadhav
Uddhav Thackeray, Murlidhar JadhavSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Political News : आगामी लोकसभा निवडणुकीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीत घेण्याबाबत ठाकरे गटाचे निष्ठावंत शिवसैनिक आणि हातकणंगलेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी विरोध केला. शेट्टी यांनी वारंवार भूमिका बदलत शिवसेनेला फाट्यावर मारले असल्याची खदखद शिवसैनिक जाधव यांनी बोलून दाखवली.

मात्र, हीच खदखद बोलून दाखवल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसेनेने जाधव यांच्यावर कारवाई करत जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी केली आहे. निष्ठावंत शिवसैनिकाला मातोश्रीवरून अशी वागणूक दिल्यानंतर जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहे. राजू शेट्टी (Raji Shetti) यांना महाविकास आघाडीत घेण्याबाबतच्या मुरलीधर जाधव यांनी विरोध दर्शविला होता.

Uddhav Thackeray, Murlidhar Jadhav
Narayan Rane On Uday Samant : एकदा मंगळसूत्र घातलं तर पावित्र्य राखा ः नारायण राणेंनी सामंतांना फटकारलं!

त्याठिकाणी वैभव उगले व संजय चौगुले नवीन जिल्हाप्रमुख नेमण्यात आले आहेत. दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर जाधव नाराज, आहेत. उद्या दि. 5 जानेवारी रोजी जाधव आपली भूमिका पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करणार आहेत. तब्बल 19 वर्षे जिल्हाप्रमुख पदावर काम करत होते. ठाकरे कुटुंबाशी अत्यंत निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर हातकणंगलेची जागा शिवसेना (Shivsena) कोट्यातून स्वाभिमानीला मिळणार हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर मुरलीधर जाधव यांच्याशी 'सरकारनामा'ने संपर्क केला. त्यांच्या देहबोलीवरून ते प्रचंड नाराज असल्याचे जाणवले. या प्रकरणावर सध्या तरी काही बोलणार नसून, आज कार्यकर्त्यांची भेट घेऊन उद्या भूमिका मांडणार आहे, अशी प्रतिक्रिया जाधव यांनी दिली.

काय म्हणाले होते मुरलीधर जाधव

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे वारंवार भूमिका बदलत आहेत. शेट्टी यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत. आयत्या बिळात नागोबा असल्यासारखे शेट्टी आहेत. माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला ठाकरे यांनी संधी द्यावी. राजू शेट्टी हा बिन भरोशाचा माणूस आहे, तो लायकीचा नाही.

Uddhav Thackeray, Murlidhar Jadhav
Nashik Political News : राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याविरोधात हिंदुत्ववादी आक्रमक..!

महाविकास आघाडीला तो मदत करणार नाही. निवडून आल्यानंतर शेट्टी हा माणूस ग्रामपंचायत,विधानसभेला मदत करणार नाही. एक रुपयाचा फंड ही देऊ शकणार नाही. राजू शेट्टी जर ठाकरे यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतील तर राजू शेट्टींची जागा कुठे आहे हे ठाकरेंना नक्कीच माहिती आहे. गेल्या अनेक वर्षापासून मी शिवसेनेचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे.

उद्धव ठाकरे यांनी मला उमेदवारी देऊन शिवसैनिकांना बळ द्यावं. उद्धव ठाकरे यांच्यावर माझा विश्वास आहे, मला न्याय देतील अशी आशा. जर माझ्या उमेदवारीबाबत निर्णय घेतला नाही, तर आठ दिवसात माझी भूमिका जाहीर करेन, असा इशाराही जाधव यांनी दिला होता.

(Edited by Amol Sutar)

Uddhav Thackeray, Murlidhar Jadhav
Arvind Kejriwal: केजरीवालांना आज अटक होऊ शकते; 'आप'च्या मंत्र्यांना भीती..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com