Vijay Shivatare Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Loksabha News : सातारा लोकसभेसाठी 'शिवसेना'ही झाली सक्रिय ; शिवतारे, कणसेंवर विशेष जबाबदारी!

Shisvsena Vijay Shivatare News : महायुतीत सातारा लोकसभा मतदारसंघ आता कळीचा मुद्दा बनल्याचे दिसत आहे.

उमेश भांबरे :सरकारनामा

Satara Political News : सातारा लोकसभा मतदारसंघावरून युतीत वाद पेटलेला असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने या मतदारसंघात विधानसभानिहाय बैठकांचा सपाटा सुरू केला आहे. त्यासाठी माजी पालकमंत्री विजय शिवतारे यांची संपर्क नेते म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे भाजप पाठोपाठ शिंदे गट शिवसेना सातारा लोकसभेसाठी सक्रिय झाली आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघ आता महायुतीत कळीचा मुद्दा झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे श्रीनिवास पाटील या मतदारसंघात प्रतिनिधित्व करत आहेत.

उदयनराजे भोसले यांच्या पराभवानंतर भाजपने या मतदारसंघात लक्ष घालून अगदी बुथनिहाय बांधणी केली. सध्या या मतदारसंघाअंतर्गत भाजपचे सातारा जावळीतुन शिवेंद्रसिंहराजे भोसले(Shivendra Singh Raje Bhosale) हे आमदार आहेत. तर शिंदे गट शिवसेनेचे पाटणचे मंत्री शंभूराज देसाई व कोरेगावातून महेश शिंदे हे दोन आमदार आहेत.

तर अजित पवार गटाचे मकरंद पाटील हे वाई मतदारसंघाचे आमदार आहेत. येथे महायुतीची ताकत मोठी आहे, भाजपने मागील ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या ग्रामपंचायतीत वर्चस्व मिळवले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशी परिस्थिती असताना मात्र सातारा लोकसभेवर शिवसेनेचाच हक्क आल्याचे सांगून येथे महायुतीच्या जागा वाटपात शिंदे गट शिवसेना आग्रही भूमिका घेण्याची तयारी करताना दिसत आहे. त्यासाठी त्यांनी सातारा लोकसभेसाठी संपर्क नेते म्हणून माजी पालकमंत्री विजय शिवतारे(Vijay Shivatare) यांची नियुक्ती केली आहे. तसेच लोकसभा मतदारसंघ निरीक्षक म्ह्णून शरद कणसे यांची नियुक्ती केली आहे.

शिवतारे यांनी आता विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका सुरू केल्या आहेत. या बैठकांच्या माध्यमातून शिंदे गट शिवसेनेची ताकत अजमावणार असून, पक्षाची बांधणी करतांना कुठे कमी पडत नाही ना हे देखील पाहणार आहेत. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघात सध्या शिंदे गट शिवसेनेने वातावरण तापलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT