Mahavikasaghadi : कोल्हापुरात 'मविआ'ला 'उमेदवार मिळेना, चर्चेचं काथ्याकूट सुरूच

Loksabha Election : महायुतीकडून प्रचाराला सुरुवात, आघाडीत मात्र शांतता
Uddhav Thackeray, Sharad pawar Balasaheb Thorat
Uddhav Thackeray, Sharad pawar Balasaheb ThoratSarkarnama

Kolhapur Political News : अवघ्या सहा महिन्यांवर लोकसभा निवडणूक आली आहे. मात्र, याची जाणीवच महाविकास आघाडीतील नेत्यांना नसल्याचे चित्र कोल्हापूर जिल्ह्यात आहे. भारतीय जनता पक्षाने मात्र गावोगावी सरकारने घेतलेल्या चांगल्या निर्णयाची माहिती देण्याचे काम सुरू झाले आहे.

विकसित भारत या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाच्या माध्यमातून वातावरण निर्मिती सुरू आहे. महायुतीचा उमेदवार ठरला नसताना प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षात अजूनही ताळमेळ नसल्याचे चित्र आहे.

त्यामुळे महाविकास आघाडीकडून लोकसभेसाठी ऐनवेळी सर्वमान्य उमेदवार देऊन धक्कातंत्राचा अवलंब केला जाण्याची शक्यता आहे.लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप- सेना (शिंदे गट) महायुती असाच सामना निश्चित आहे. २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या चिन्हावर विजयी झालेले दोन्ही खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले आहेत.

Uddhav Thackeray, Sharad pawar Balasaheb Thorat
Prithviraj Chavan: भाजप नेत्याचा पृथ्वीराज चव्हाणांवर आरोप; सरकार अन् स्थानिकांमध्ये समन्वय न ठेवल्याने...

त्यामुळे या दोन्ही जागांवर शिंदे गटाचा दावा प्रबळ आहे. तथापि भाजपने यापैकी एक जागा पक्षाच्या 'कमळ' चिन्हावर लढवली जाईल, असे सांगत एका जागेवर भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हक्क सांगितला आहे. त्यातून एक जागा भाजपला गेलीच तर आहे तेच उमेदवार रहाणार की दुसरा उमेदवार याविषयी उत्सुकता आहे.

भाजपच्या या दाव्याने शिंदे गटात अस्वस्थता आहे. महाविकासमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी- शरद पवार गट व शिवसेना-उद्धव ठाकरे गट एकत्र आहेत. गेल्यावेळी दोन्ही जागा जिंकल्याने या दोन्ही जागांवर शिवसेना हक्क सांगण्याची शक्यता आहे.

पण, आजच्या घडीला या तीनही पक्षांकडे प्रबळ उमेदवार नाही. कोल्हापुरातून कॉंग्रेसला चांगली संधी दिसत असली तरी उमेदवार घेण्यास कोणी तयार नाही.

Uddhav Thackeray, Sharad pawar Balasaheb Thorat
Shivraj Singh Chouhan : लाडक्या बहिणी गळ्यात पडून ढसाढसा रडल्या; समजूत काढता-काढता ‘मामा’ही भावूक

राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाकड़ून जी नावे येतील त्यावर एकमत होईल का नाही, याविषयी शंका आहे. त्यातून ऐनवेळी उमेदवारीची घोषणा महाविकास आघाडीकडून शक्य आहे. शिवसेना युवा नेते आमदार आदित्य ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यात उमेदवारी विषयी चर्चा होण्याची शक्यता आहे.

(Edited by Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com