Vijay Shivtare, Uddhav Thackeray Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shiv Sena News : ...तर आज ही वेळ आलीच नसती! उद्धव ठाकरेंची पहिली चूक शिवतारेंनी सांगितली

Vijay Shivtare : शिवसेनेच्या राष्ट्रीय महाअधिवेशनामध्ये शिवतारेंनी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

Rahul Gadkar

Kolhapur News : शिवसेना फुटीनंतर आजही शिंदे गटाच्या आमदार आणि माजी आमदारांमध्ये उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल धग कायम आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय महाअधिवेशनानिमित्त कोल्हापुरात आलेल्या आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेत भूमिका मांडली आहे. (Shiv Sena News)

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर (Assembly Election) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रायव्हेटेड लिमिटेड कंपनी असल्यासारखे निर्णय घेत काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा पुनर्विचार करत आज शिवसेना शिंदे गटाच्या माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी ठाकरेंच्या या निर्णयाविरोधात भूमिका मांडली.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काहींची कायमची दारं बंद करून घेतली आहेत. ज्यावेळी ते काँग्रेस सोबत गेले त्यावेळी बाळासाहेबांचा विचारांचा वारसा सोडून दिला. त्यावेळीच त्यांची दारे बंद झाली. बाळासाहेबांनी शेवटपर्यंत सांगितलं होतं, पक्षाचे दुकान बंद झालं तरी मी काँग्रेससोबत जाणार नाही. बाळासाहेबांनी शेवटच्या दसरा मेळाव्यात एक संदेश दिला होता. मात्र ठाकरे गटांकडून एकच संदेश सांगितला जातो. यांना सांभाळा त्यांना सांभाळा, असा टोला शिवतारेंनी लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसची पंचसूत्री गाडा हा संदेशही बाळासाहेबांनी दिला होता. बाळासाहेबांच्या शेवटच्या विचारांची पायमल्ली उद्धव ठाकरे यांनी केली. त्यामुळे यायचे दरवाजे त्यांनी स्वतःच बंद करून घेतले, अशा शब्दांत शिवतारे यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. आमचा उठाव झाल्यानंतर राष्ट्रीय कमिटीची उद्धव ठाकरेंनी बैठक घेतली. राज्य कार्यकारणीची बैठक घेतली. ही सर्वात मोठी चूक होती, असेही शिवतारे यांनी सांगितले.

2019 ला जर काँग्रेस सोबत जाण्याच्या वेळी राज्य कार्यकारिणीची बैठक घेतली असती तर त्याचवेळी विरोध झाला असता. इतर कोणालाही विश्वासात न घेता प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्यासारखा निर्णय घेतला. त्याचवेळी मीटिंग झाली असती तर महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आलं नसतं, असे स्पष्टीकरण विजय शिवतारे यांनी दिले.

(Edited By - Rajanand More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT