Gaon Chalo Abhiyan : गावकऱ्यांसोबत पंगतीत जेवण अन्‌ कार्यकर्त्याच्या घरी मुक्काम; आमदार सातपुते रमले फडतरीत

Ram Satpute News : शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या, एवढेच नाही तर त्यांच्यासोबत शेतात मशागतही आमदारांनी केली.
Ram Satpute
Ram SatputeSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : भारतीय जनता पक्षाच्या वतीने गाव चलो अभियान सुरू आहे. या अभिायनांतर्गत माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी फडतरी या गावात एक दिवस मुक्काम केला. या २४ तासांत आमदार सातपुते यांनी सरकारच्या विविध योजनांचा प्रचार करताना स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यान, आमदार सातुपते यांनी पंगतीत गावकऱ्यांसोबत रात्रीचे जेवण केले आणि कार्यकर्त्याच्या घरीच मुक्काम केला, त्यामुळे अख्खा फडतरीला आमदाराच्या मुक्कामाचे आकर्षण होते. (MLA Ram Satpute's stay at activist's house during BJP's Gaon Chalo Abhiyan)

भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभर सध्या गाव चलो अभियान राबविण्यात येत आहे. त्याद्वारे सरकारी योजनांचा प्रचार आणि प्रसार केला जात आहे. त्या अभियानाचा एक भाग म्हणूनच आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यातील फडतरी या गावाला भेट दिली. गावातील भारतीय जनता पक्षाचे बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि सुपर वॉरियर्स यांची सातपुते यांनी भेट घेतली. तसेच, बूथनुसार बैठका घेऊन संघटनात्मक कामांचा आढावा घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ram Satpute
Baramati Loksabha : सुनेत्रा पवारांनी फुंकले प्रचाराचे रणशिंग; भाजप आमदार राहुल कुल यांची घेतली भेट

आमदार सातपुते यांनी कार्यकर्त्यांसोबत गावात सार्वजनिक ठिकाणच्या दर्शनी भागात दिवार लेखन करत कमळ आणि पुन्हा एकदा मोदी सरकार या आशयाने भिंतीही रंगवल्या. गावकऱ्यांनी बैलगाडीतून मिरवणूक काढून आमदार सातपुते यांचे गावात स्वागत केले. सायंकाळी सातपुते यांची जाहीर सभा झाली. त्यात सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या कामांची जनजागृती केली. देशातील विकासाची घौडदौड अशीच चालू राहण्यासाठी पुन्हा एकदा केंद्रात मोदी सरकारला निवडून द्या, असे आवाहन आमदार सातपुते यांनी केले.

दरम्यान, ग्रामीण सांस्कृतिक ठेवा असणाऱ्या गजी ढोल या कार्यक्रमात आमदार सातपुते यांनी सहभागी होऊन त्यावर ताल धरला. या एक दिवसाच्या मुक्कामात आमदारांचे सर्वसामान्यांशी नाते जोडले गेले. दरम्यान, सातपुते यांनी रात्री पंगतीत गावकऱ्यांसोबत बसून रात्रीचे जेवण केले आणि कार्यकर्त्याच्या घरी मुक्काम केला.

Ram Satpute
Maharashtra Politics : पवारांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी काँग्रेस नेत्यांजवळ केलेले 'ते' विधान खरे ठरण्याची शक्यता...

आमदार राम सातपुते यांनी दुसऱ्या दिवशी गावातील प्रतिष्ठित, दुकानदार, डॉक्टर, वकील, शिक्षक यांच्यासह सामान्य नागरिकांना भेटून मोदी सरकारच्या योजनांची माहिती घरोघरी फिरून पत्रके वाटून दिली. शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या, एवढेच नाही तर त्यांच्यासोबत शेतात मशागतही आमदारांनी केली.

Ram Satpute
NCP MLA Disqualification Case : निकालाचे स्वागत अन्‌ विधानसभा अध्यक्षांच्या सूचनांचे पालन करू; अजित पवार गटाची प्रतिक्रिया

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com