Kolhapur Shivsena & NCP Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

जिल्हा बँकेत शिवसेनेला एक जागा हवीच..

राज्यात महाविकास आघाडी त्याप्रमाणे आम्ही कोल्हापूर (Kolhapur)जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) मध्येही हा धर्म पाळला. असे चंद्रदीप नरके म्हणाले.

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत शिवसेनेला (Shivsena)संचालक म्हणून एक जागा मिळावी, अशी मागणी माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी ग्रामविकासमंत्री व केडीसी बॅंकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्याकडे आज (ता.५ ऑक्टोबर) केली. नरके यांनी मंत्री मुश्रीफ यांची मुंबईत भेट घेवून ही मागणी केली आहे.

नरके म्हणाले, राज्यात महाविकास आघाडी त्याप्रमाणे आम्ही कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) मध्येही हा धर्म पाळला. पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत आम्ही गोकुळच्या निवडणूकीत तसेच, जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडणूकीतही एकसंघ राहिलो आहे. कोणत्याही एका गटातून, इतर मागासवर्गीय किंवा महिला राखीवमधून शिवसेनेला एक जागा द्यावी, अशी अपेक्षा नरके यांनी केली.

जिल्हा बॅंकेत शिवसेनाचा एक तरी संचालक असावा. बॅंकेत दूध, पाणी पुरवठा संस्था गटात आमचीही मते आहेत. गावागावात दूध संस्था व पाणी पुवरठा संस्था शिवसेनेच्या ताब्यात आहेत. याचा निश्‍चितपणे जिल्हा बॅंकेला फायदा होणार आहे. त्यामुळे, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनाही बॅंकेत पदाधिकारी म्हणून संधी मिळावी, यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशीही उद्या बुधवारी (ता.६ ऑक्टोबर) चर्चा करणार असल्याचे नरके यांनी सांगितले.

गोकुळच्या निवडणूकीत आमदार पी.एन. पाटील हे सतेज पाटील व मुश्रीफ यांच्या विरोधी पॅनेलमध्ये होते. तरीही जिल्हा परिषदेमध्ये त्यांना अध्यक्षपद दिले. यावर आघाडी धर्म म्हणून आम्ही पालकमंत्री आणि ग्रामविकासमंत्री यांच्या भूमिकेशी सहमत राहिलो. आता, आघाडी धर्म म्हणून शिवसेनेलाही एक जागा मिळाली पाहिजे, असे नरके यांनी मुश्रीफ यांना सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT