Solapur, 10 April : वक्फ बोर्ड विधेयकाच्या पाठिंब्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पोस्टर फाडणाऱ्या सोलापूरमधील ओंकार चव्हाण याच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. भाजप आणि मिंधे गटाचा हा डाव आहे. शिवसेना पदधिकाऱ्यांनी ओंकार चव्हाण याच्याविरोधत फौजदार चावडी पोलिस ठाण्यात तक्रारी दिली असून त्याला तातडीने अटक करण्यात यावी; अन्यथा शिवसैनिक त्याला जागा दाखवतील, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून देण्यात आला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shivsena UBT) जिल्हाप्रमुख अजय दासरी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले. त्यात म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध केला आणि त्यांनी हिंदुत्व सोडले आहे, त्यामुळे आपण पक्षाचा राजीनामा देत आहोत, असे चव्हाण याने असत्य आणि खोटे कारण पुढे केले आहे. चव्हाण याची ही वैयक्तिक मते नसून पक्षविरोधी आणि पक्षशिस्तीचा भंग करण्याचा प्रकार आहे.
पक्षविरोधी कारवाई केल्याने ओंकार चव्हाण याला यापूर्वीच पदावरून दूर करण्यात आले आहे. त्याचा पक्षाशी कोणताही संबंध नाहीत. त्याचा आजचा प्रकार हा भाजप (BJP) आणि मिंधे गटाचा डाव आहे. तो शिवसैनिक हाणून पाडतील. या माथेफिरूवर तत्काळ कारवाई करून अटक करावी; अन्यथा शिवसैनिक त्याला त्याची जागा दाखवतील असेही जिल्हाप्रमुख दासरी यांनी पत्रकात म्हटले आहे.
ओंकार चव्हाण याच्या विरोधात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. चव्हाण याला तातडीने अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. चव्हाण याने केलेला हा प्रकार केवळ उद्धव ठाकरे यांच्याच नव्हे, तर संपूर्ण शिवसेनेच्या विचारधारेचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा अवमान आहे, असा दावा शिवसैनिकांनी केला आहे.
हिंदुत्व आमच्या हृदयात आहे. द्वेष आणि फोडाफोडीच्या राजकारणाला थारा दिला जाणार नाही, त्यामुळे पक्षशिस्त आणि नेतृत्वाचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, शहरप्रमुख महेश धाराशिवकर, दत्ता वानकर, विधानसभाप्रमुख दत्ता माने, निवडणुक यंत्रणा प्रमुख शशिकांत बिराजदार, कामगार सेना सचिव अजय खांडेकर, उपशहरप्रमुख चंद्रकांत मानवी आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.