Shiv sena UBT : उद्धव ठाकरेंचा फोटो फाडत सोलापूर उपशहरप्रमुखाने दिला शिवसेनेचा राजीनामा; म्हणाले, ‘अशा हिंदुत्ववादी नेत्याचा निषेध करतो...’

Solapur city vice President Resign : वक्फ बोर्डाच्या कायद्यात सुधारणा करत मोदी सरकारने नवा कायदा संसदेत मंजूर केला आहे. त्या कायद्याच्या मतदानावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विरोधाची भूमिका पार पाडत नव्या सुधारणावादी कायद्याला कडाडून विरोध केला होता.
Shiv sena UBT
Shiv sena UBT Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 10 April : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. वेगवेगळी कारणं देत पक्षाचे पदाधिकारी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत आहेत, त्यामुळे पक्षाची ताकद दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यातच नुकतेच संसदेत मंजूर झालेल्या वक्फ बोर्डाच्या नव्या कायद्याला दिलेल्या पाठिंब्यावरून चक्क पक्षाच्या सोलापूर उपशहरप्रमुखाने उद्धव ठाकरेंचा फोटो फाडून पक्षाच्या भूमिकेचा निषेध केला. तसेच, उपशहरप्रमुखपदाचा राजीनामाही दिला आहे.

वक्फ बोर्डाच्या कायद्यात सुधारणा करत मोदी सरकारने नवा कायदा संसदेत मंजूर केला आहे. त्या कायद्याच्या मतदानावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने (Shivsena UBT) विरोधाची भूमिका पार पाडत नव्या सुधारणावादी कायद्याला कडाडून विरोध केला होता.

शिवसेनेच्या वतीने अरविंद सावंत यांनी लोकसभेत, तर संजय राऊत यांनी राज्यसभेत विरोधाची भूमिका मांडली हेाती. दोघांनी संसदेत तडखेबंद भाषणे करत मोदी सरकारच्या या सुधारणांमधील फोलपणा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, शिवसेना उद्वव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ही भूमिका काही पदाधिकाऱ्यांना रुचली नसल्याचे दिसून येते.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सोलापूर (Solapur) उपशहरप्रमुख ओंकार चव्हाण यांनी पक्षाची ही भूमिका न पटल्याने पक्षातील पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो असलेला बॅनर फाडून वक्फ कायद्यावरून पक्षाने घेतलेल्या भूमिकेचा निषेध केला आहे, त्यामुळे उपशहरप्रमुख चव्हाण यांच्या भूमिकेमुळे संघटनेतील असंतोष पुन्हा एकदा उफाळून आल्याचे मानले जात आहे.

Shiv sena UBT
Sangola Politic's : उपमुख्यमंत्री शिंंदेंसह पाच मंत्री आज सांगोल्यात; शहाजीबापूंच्या विधान परिषदेचा शब्द जाहीरपणे मिळणार?

वक्फ कायद्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विरोध केला जात आहे. त्याचा मी पक्षाचा उपशहरप्रमुख म्हणून निषेध करतो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जुन्या वक्फ कायद्याचे समर्थन करून नव्या सुधारणाला विरोध करत आहेत. हिंदूंची अनेक मंदिरे ‘वक्फ’च्या नावाखाली लुटली गेली आहेत. अशा कायद्याचा आणि अशा हिंदुत्ववादी नेत्याचा मी निषेध करतो, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेचा विचार न करता मुस्लिम समाजाला पाठिंबा देऊन आपला अजेंडा कायम ठेवला आहे. अशा हिंदुत्ववादी नेत्याचा मी निषेध करतो. पक्षाचा आणि पक्षनेतृत्वाच्या भूमिकेचा निषेध म्हणून माझ्या उपशहरप्रमुखपदाचा आणि शिवसेनेचा राजीनामा देत आहे, असेही चव्हाण यांनी जाहीर केले.

Shiv sena UBT
Supriya Sule : अजितदादांच्या टीकेला सुळेंचं प्रत्युत्तर; थेट PM मोदींचा उल्लेख करत म्हणाल्या, "गडकरी आम्हाला मदत करतात पण..."

बाळासाहेब ठाकरे होते, तोपर्यंत शिवेसेनेचे हिंदुत्व होते. आता ही शिवसेना राहिली नसून मुघल सेना झाली आहे, असाही आरोप सोलापूर उपशहरप्रमुख ओंकार चव्हाण यांनी केला आहे, त्यामुळे वक्फ बोर्डाच्या कायद्याला पाठिंबा देण्यावरून शिवसेनेत मतभेद असल्याचे दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com