Shivsena UBT sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maharashtra Karnataka conflict : कर्नाटकच्या बसवर भगवा फडकवला, ठाकरेंची शिवसेनेने फोडली डरकाळी

Shivsena UBT : कर्नाटकात येताय तर कन्नडच बोलायचं असं म्हणत शुक्रवारी (ता.21) मराठी ST चालकाच्या तोंडाला काळं फासत बसचीही तोडफोड कर्नाटकमधील चित्रदुर्गजवळ करण्यात आली.

Rahul Gadkar

Kolhapur News : एकीकडे महाराष्ट्र एकीकरण समितीने सांगलीतून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून आंदोलन सुरू केले आहे. तर दुसरीकडे आता कन्नडीगांचा उन्माद सुरू झाला आहे. कन्नडीगांनी महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची छेड काढली आहे. कर्नाटकमधील चित्रदुर्गजवळ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस (ST Bus) चालकाच्या तोंडाला काळे फासत बसचीही तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे आता सीमावर्ती भागात याचे तीव्र पडसाद उमटायला सुरूवात झाली असून कोल्हापूर शहरात याचा शिवसेना ठाकरे गटाने निषेध केला आहे.

कर्नाटकमधील चित्रदुर्गजवळ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस कन्नडीगांनी फोडली. तसेच चालकाला कर्नाटकात येताय तर कन्नडच बोलायचं असं म्हणत त्याच्या तोंडाला काळे फासले. यामुळे आता संतापाची लाट उसळली आहे.

या प्रकरणावरून कोल्हापुरात उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. शुक्रवारी (ता. 21) कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे कन्नड संघटनांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला काळ फासून ड्रायव्हरला देखील मारहाण केली. यामध्ये कन्नड रक्षण वेदिका या संघटनेच्या कार्यकर्त्यांना हात आहे.

याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून डरकाळी फोडण्यात आली असून आज शनिवार (ता.22) झालेल्या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानका बाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी कन्नड संघटनांनी केलेल्या या कृत्याच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.

विशेष म्हणजे कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकातून कर्नाटक मध्ये जाणारी वाहतूक यावेळी रोखून धरली. तर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारला इशारा देत कर्नाटकच्या बस वर भगवा ध्वज फडकवला.

कन्नडीगांचा उन्माद वाढत असून या ना त्या कारणावरून कानडी सतत महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची छेड काढत असतात. आता बस चालकावर हात टाकत त्याच्या तोंडाला काळे फासले आहे. यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र कर्नाटक वाद पेटण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT