Maharashtra-Karnataka Border Dispute : जयंत पाटील, विशाल पाटील सीमाप्रश्नावर लढणाऱ्या म. ए समितीला बळ देणार

Jayant Patil & MPs Vishal Patil : गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुरू आहे. यावर कर्नाटक सरकार कायदेशीर लढाईत पुढे जात असून महाराष्ट्र सरकार आवाज उठवताना दिसत नाही. यावरून आता महाराष्ट्र एकीकरण समिती आक्रमक झाली आहे.
 Jayant Patil & MPs Vishal Patil
Jayant Patil & MPs Vishal PatilSarkarnama
Published on
Updated on

Sangli News : गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुरू आहे. पण यावर केंद्र सरकार गंभीर नाही. तसेच याबाबत संसदेत कोणतीच चर्चा होताना दिसत नाही. यामुळेच आज कर्नाटक सरकार भाषिक अल्पसंख्याकांकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे सीमाप्रश्नावर संसदेत खासदार विशाल पाटील यांनी आवाज उठवावा अशी मागणी म. ए. समितीचे कार्याध्यक्ष व माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्र सरकारकडील प्रलंबित प्रश्न आमदार जयंत पाटील यांनी लक्ष घालून सोडविण्यासाठी सहकार्य करावे असेही आवाहन किणेकर यांनी केले आहे. याबाबत म. ए. समितीने विशाल पाटील आणि जयंत पाटील यांना निवेदन दिले.

समितीने महाराष्ट्र सरकारकडील अनेक प्रश्न प्रलंबित असून संसदेत देखील भाषिक अल्पसंख्याकांचा प्रश्न उचलला जात नाही. यामुळे सीमाप्रश्नासह प्रलंबित प्रश्न लवकर महाराष्ट्र सरकारने सोडवावेत अन्यथा अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी मुंबईत धरणे आंदोलन करण्याचा इशारा समितीने महाराष्ट्र सरकारला दिला आहे.

यावेळी समितीने जयंत पाटील यांची भेट घेऊन प्रश्न मांडले असता त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तत्काळ भेट घेण्याचा शब्द दिला आहे. तसेच आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुंबई येथे होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आयोजित केल्या जाणाऱ्या धरणे आंदोलनात स्वतः सहभागी होण्यासह आंदोलनाला बळ देण्याचे आश्वासन देखील दिले आहे.

 Jayant Patil & MPs Vishal Patil
Jayant Patil News: भाजपप्रवेशाच्या चर्चांनी वैतागलेल्या जयंत पाटलांचा संयम संपला; म्हणाले,गडकरी आता राष्ट्रवादीत...!

दरम्यान खासदार विशाल पाटील यांना देखील निवेदन देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळाने सीमाप्रश्नात दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि माजी खासदार दिवंगत प्रकाशबापू पाटील यांनी लक्ष घातले होते, याची आठवण करवून देताना या प्रश्नावर संसदेत चर्चा होणे खूप महत्त्वाचे असल्याचे म्हटलं आहे. यामुळे सीमाभागात असणाऱ्या खासदार पाटील यांनी सीमाप्रश्‍न संसदेत मांडवा. तसेच याबाबत महाराष्ट्रातील सर्व खासदार एकत्र यावेत आणि केंद्र सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली.

 Jayant Patil & MPs Vishal Patil
MLA Gopichand Padalkar On Jayant Patil : पडळकरांना जयंत पाटील का गुस्सा क्यों आता है?

माजी आमदार मनोहर किणेकर यांनी, सर्वोच्च न्यायालयातील दाव्याला विलंब होत असल्याने कर्नाटकी दडपशाही वाढत आहे. तसेच विविध मार्गातून अन्याय केला जात आहे. याची महाराष्ट्र सरकारने दखल घ्यावी. सीमाप्रश्नावर महाराष्ट्राने आक्रमकपणे प्रश्नाची सोडवणूक करावी, अशी मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com