Ratnagiri News : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सध्या कोकणात गळती लागली असून अनेक दिग्गज नेत्यांसह आजी-माजी नगरसेवकही पक्षाची साथ सोडत आहेत. चिपळूण शहर शिवसेनेचे माजी शहरप्रमुख शशिकांत मोदी यांनी देखील ठाकरेंची साथ सोडत काहीच दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी पक्षाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. नगरसेवक, जिल्हा नियोजन समितीचे सदस्यपद देणाऱ्या ठाकरे गटाला त्यांनी वेळ देता येत नाही, असे कारण देत सोडचिठ्ठी दिली होती. तर दुसऱ्याच दिवशी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या प्रवेशामुळे आता शहरप्रमुखपद रिक्त झाले असून ठाकरे गटात रस्सीखेच सुरू झाली आहे. सध्या चार नावे चर्चेत आहेत.
शिवसेनेचे शहरप्रमुख, माजी नगरसेवक शशिकांत मोदी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने चिपळूण शहरात शिवसेनाला आता वाली कोण असा सवाल उपस्थित केला जातोय. मोदी यांनी शिवसेनाला शहरात उभारी दिली होती. आता तेच भाजपमध्ये गेल्याने त्यांची जागा कोण घेणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.
दरम्यान आता रिक्त झालेल्या जागेसाठी ठाकरे गटात रस्सी खेच होताना पाहयला मिळत असून चार नावे चर्चेत आहेत. सध्या शहरप्रमुख पदासाठी माजी नगरसेवक मनोज शिंदे, संतोष पवार, भैय्या कदम, माजी नगरसेवक संजय रेडीज इच्छुक असून यांनी लॉबिंग सुरू केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून येथे शिवसेना भक्कम करण्याचे काम शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी केलं होते. मात्र पक्ष फुटीनंतर सकपाळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. यामुळे शहर शिवसेनेत पोकळी निर्माण झाली होती. त्यावेळी शिवसेना शहरप्रमुख पदाची जबाबदारी माजी नगरसेवक शशिकांत मोदी यांच्याकडे देण्यात आले. त्यांनीही काही काळ पक्षाची मोट बांधली.
पण काही वर्षातच त्यांनीही उबाठा शिवसेनेला पक्षाला वेळ देता येत नसल्याचे कारण देत जय महाराष्ट्र केला आहे. त्यामुळे सध्या शिवसेनाला येथे कणखर नेतृत्व नसल्याचेच समोर येत आहे. अशावेळी उबाठा शिवसेनेतील माजी नगरसेवक मनोज शिंदे, संतोष पवार, भैय्या कदम, माजी नगरसेवक संजय रेडीज यांची नावे शहरप्रमुख पदासाठी चर्चेत आहेत.
यातील कुणावर जबाबदारी दिली जाते आणि कोण उबाठा शिवसेनेला पुन्हा एकदा उभारी देतो, हे येणारा काळच ठरवेल. शहरात ठाकरे गटाची चांगली ताकद असून कार्यकर्त्यांचे संघटनदेखील मजबूत आहे. मात्र पक्षाअंतर्गत बंडामुळे अनेक पदाधिकारी शिवसेना शिंदे गटाकडे चालले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.