Shivsena UBT : येणार येणार साहेब नक्की येणार, पण तारीख नाही सांगणार! ठाकरेंचा पुणे दौरा वेटिंगवर, शिवसैनिकांचा जीव टांगणीला

Uddhav Thackeray Pune visit : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे पुणे दौरावर येणार असल्याच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू आहेत. या दौऱ्या दरम्यान ते शाखाप्रमुखांची भेट घेणार आहेत. मात्र, ते नेमके कधी येणार? याबाबत खात्रीलायक माहिती मात्र कोणाकडेच नाही.
Shivsena UBT News
Shivsena UBT NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 08 Feb : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shivsena UBT) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे पुणे दौरावर येणार असल्याच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू आहेत. या दौऱ्या दरम्यान ते शाखाप्रमुखांची भेट घेणार आहेत.

मात्र, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नेमके कधी येणार? याबाबत खात्रीलायक माहिती मात्र कोणाकडेच नाही. यापूर्वी उद्धव ठाकरेंच्या पुणे दौऱ्याचे दोन मुहूर्त सांगण्यात आले होते. मात्र दौऱ्याला मुहूर्त काही लागला नाही. त्यामुळे ठाकरे सेनेचे नेते "येणार येणार साहेब नक्की येणार..." पण तारीख नाही सांगणार अशा भूमिकेत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात (Pune) ठाकरे गटाची मोठ्या प्रमाणात वाताहात झाली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या फ्लॉप परफॉर्मन्सनंतर पक्षातील पाच माजी नगरसेवकांनी पक्ष सोडला आणि भाजपमध्ये प्रवेश केला.

Shivsena UBT News
Santosh Deshmukh : फोन ठेवताच पप्पा खूप घाबरलेले...; हत्येच्या आदल्या दिवशी आलेला 'तो' फोन कुणाचा? संतोष देशमुख नेमकं काय बोलले? वैभवीने जबाबात सांगितलं

या धक्क्यापासून सावरतो ना सावरतो तोच ठाकरे गटातील शाखाप्रमुख विभाग प्रमुख आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता पुण्यातील काही माजी नगरसेवक शिंदेसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. अशाप्रकारे ठाकरे सेनेला धक्क्यावर धक्के मिळत असताना. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे शहरातील शाखाप्रमुखांना भेटणार असल्याचं बोललं जात होतं.

शहर प्रमुख संजय मोरे आणि ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी उद्धव ठाकरेंची महिन्यापूर्वी भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी ठाकरेसाहेब लवकरच शहरातील शाखाप्रमुखांना भेटतील असं जाहीर केलं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरे नेमकं कधी भेटणार याबाबत शाखाप्रमुखांना उत्सुकता आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे 28 फेब्रुवारी दरम्यान पुणे दौऱ्यावर येतील असं सांगण्यात येत होतं.

Shivsena UBT News
Girish Mahajan News : गिरीश महाजनांचा पालकमंत्रिपदाचा मार्ग मोकळा, घोषणेला का होतोय विलंब?

पण तो मुहूर्त हुकल्यानंतर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ठाकरे येतील अशी अपेक्षा शाखा प्रमुखांना होती. मात्र आता पहिला आठवडा उलटून गेल्यावर ठाकरेसेनेचे कार्यकर्ते शहरातील वरिष्ठ नेत्यांकडे उद्धव साहेब कधी येणार? याबाबतची विचारणा करत आहेत.

मात्र त्यांना साहेब नक्की येणार आहेत. लवकरच आपण तारीख घेऊ, असं आश्वासन देण्यात येत आहे. आता उद्धव ठाकरे हे अधिवेशन संपल्यानंतर पुणे दौऱ्यावर येतील असं सांगण्यात येत आहे. मात्र आता तरी ठाकरेंच्या पुणे दौऱ्याला मुहूर्त लागणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com