Shivsena UBT
Shivsena UBT Sarkarnama

Solapur Shivsena UBT : सोलापुरातील पडझडीनंतर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर ‘डॅमेज कंट्रोल’साठी बैठक; पदाधिकाऱ्यांनी दिला ‘हा’ शब्द!

Damage Control Meeting At Matoshree : सोलापुरातून माजी राज्यमंत्री, माजी आमदार आणि जिल्हाप्रमुखाने साथ सोडल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून डॅमेज कंट्रोलसाठी तातडीने मातोश्रीवर बैठक घेण्यात आली.
Published on

Solapur, 08 March : सोलापुरातून माजी राज्यमंत्री, माजी आमदार आणि जिल्हाप्रमुखाने साथ सोडल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून डॅमेज कंट्रोलसाठी तातडीने मातोश्रीवर बैठक घेण्यात आली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोलापूर शिवसेनेचे उपनेते, पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सोलापूरचा शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत असल्याचा विश्वास या वेळी पदाधिकाऱ्यांकडून पक्षप्रमुखांना देण्यात आला.

या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळी, उपनेत्या अस्मिता गायकवाड, जिल्हाप्रमुख अजय दासरी यांच्यासह सोलापुरातील (Solapur) बहुतांश पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीला सोलापुरातून गेलेले पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना खंबीरपणे साथ देण्याचा शब्द दिला.

दक्षिण सोलापूरमध्ये जरी गद्दारी झाली असली तरी सोलापूरचे सर्व पदाधिकारी हे आज मातोश्रीवर आले होते. त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सांगितले की एक गद्दार जरी गेला तरी शंभर पट्टीने आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. अमर पाटील यांनी नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांपैकी फक्त दोघे त्यांच्यासोबत गेले आहेत, बाकीचे पदाधिकारी आज मातोश्रीवर आले होते, त्यामुळे त्यांच्यावर शंका नाही, असे शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी स्पष्ट केले.

Shivsena UBT
Jayant Patil Attack On Padalkar : जयंत पाटलांचा गोपीचंद पडळकरांवर पलटवार; म्हणाले, ‘भुंकणारे भूंकतच राहतात, आपण आपल्या चालीनं’

सोलापूरच्या बैठकीत कोणतेही मतभेद झाले नाहीत. बैठक खेळीमेळीने झाली. अमर पाटील यांना जिल्हाप्रमुखांना देण्याबाबत विरोध होता, तरीही देण्यात आलं, त्याबाबत बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. प्रश्नावर विनायक राऊतांनी ‘असं काही झालं नाही’ असे सांगितले. मात्र, जिल्हाप्रमुख नेमताना एक तरुण मुलगा म्हणून उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडे पाहिले होते. त्यांचे वडिल आमदार होते, भविष्यात त्यांच्याकडून चांगलं काम होईल, असं पाहिलं. त्यांना विधानसभेची उमेदवारीही देण्यात आली हेाती. पण घाण खायची ती खाल्लीच त्यांनी, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

सोलापूरचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांच्याबाबत कोणतीही नाराजी नव्हती. बैठकीत तसा कोणताही मुद्दा आलेला नाही, त्यामुळे सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांसोबत हसत खेळत बैठक झाली.

या बैठकीबाबत सोलापूरचे संपर्कप्रमुख अनिल कोकीळ म्हणाले की, अमर पाटील हे एकटे मिंदे गटात गेले आहेत. सर्व शिवसैनिक मातोश्री आणि उद्धव ठाकरेंसोबत आहे, असे सांगायाला सोलापूरचे पदाधिकारी आले होते. स्थानिक पदाधिकाऱ्यांना डावलून अमर पाटील यांना उमेदवारी अथवा पद दिले म्हणून बैठकीत कोणीही नाराजी व्यक्त केली नाही. सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे.

Shivsena UBT
Satish Bhosale : ‘अण्णा मुख्यमंत्री व्हावेत...मग ते कोणत्याही पक्षातून!’; सुरेश धसांचा फरार कार्यकर्ता सतीश भोसले ऊर्फ खोक्याभाईचा नवा व्हिडिओ व्हायरल

आम्ही अमर पाटील यांच्यासाठी काम केलं पण त्यांनी पक्ष बदलला, त्यामुळे आमच्या मनात चीड होती. ते शिंदे गटात गेले असले तरी शिवसैनिक हे ठाकरेंच्या सोबत आहेत, हे सांगण्यासाठी आम्ही आज मातोश्रीवर आलो होतो, असे रविकांत कांबळे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com