Satish Bhangre
Satish Bhangre Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

अकोल्यात शिवसेनेला खिंडार पडणार?

शांताराम काळे

अकोले ( जि. अहमदनगर ) - अहमदनगर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका अवघ्या दीड महिन्यावर आल्या आहेत. त्यामुळे राजकीय परिस्थिती पाहून इच्छुक उमेदवार आपला पक्ष निवडू लागले आहेत. अकोले तालुक्यातील असा पहिला धक्का शिवसेनेला ( Shivsena ) बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेतील काही जन दुसऱ्या पक्षात जाण्याच्या तयार असल्याची चर्चा आहे. ( Shiv Sena will have a rift in Akole? )

अकोले तालुक्यात पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय भूकंप सुरू झाले आहेत. युवानेते सतीश भांगरे पुन्हा स्वगृही म्हणजेच काँग्रेसमध्ये जाण्याचे संकेत मिळू लागले आहेत. शिवसेनेचे अनेक पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य शिवबंधन तोडण्याच्या तयारीत आहेत. काही नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर काही नेते काँग्रेस पक्षात जाणार आहेत.

अकोले तालुक्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हलाचालींना वेग आल्याच दिसुन येत आहे. अकोले तालुक्यातील महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेना पक्षातून अनेक नेते बाहेर पडणार असल्याची खात्रीलायक चर्चा अकोले तालुक्यात सुरु आहे. या मध्ये प्रामुख्याने सतीश भांगरे सध्या अकोले तालुक्यात चर्चेत आहेत.

विविध पदावर काम करत असताना पक्षातील पदाधिकारी यांच्याकडून सहकार्य न होता कायमच त्रासदायक अशी भूमिका घेत खच्चीकरण केल्याची भावना निर्माण झाल्यावर हे लोक खासगीत बोलत आहेत. तर शिवसेनेतील पाच लोक पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचा सध्या चर्चा जोरात सुरु आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सतीश भांगरे यांचे बॅनर अकोले शहरात लावले गेले होते. मात्र या बॅनरवर थोरात वगळता कोणत्याही नेत्याचा फोटो दिसुन आला नाही तसेच त्यांच्या गाडीच्या पाठीमागे असलेला शिवसेना पक्षाचा लोगो त्यांनी काढून घेतला आहे या कारणाने युवानेते सतीश भांगरे हे पक्ष सोडतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

दराडे, मेंगाळ यांना ही पक्ष तालुका पदाधकारी कोणत्याही विषयामध्ये विश्वासात घेत नसून अनेक बैठकांना त्यांना पक्षीय कार्यक्रमाचे निमंत्रण देताना टाळले जाते, हे टाळणेच त्यांना वारंवार खटकत असुन या विषयी जिल्हा व राज्याच्या नेत्यांकडे ही अनेकवेळा नाराजी सष्ट केली असुन तरी कोणतेही बद्दल होत नसल्याने अखेर कंटाळून या सर्वांनी पक्ष सोडण्याचा विचार केल्याचे दिसुन येत आहे. सतीश भांगरे हे अनेक दिवसांपासून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संपर्कात असुन अनेक भेटीगाठी झाल्याची चर्चा आहेत. सतीश भांगरे यांचा राजकीय प्रवेश काँग्रेस पक्षातून झाला होता. आज पुन्हा ते काँग्रेस पक्षात येत असल्याने ते स्वगृही येत असल्याच अकोले काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आपल मत व्यक्त केल आहे.यामुळे अकोले तालुक्यात राजकीय भूकंप होणार हे निश्चित झाले आहे.

या नेत्यांशी खासगीत चर्चा केली असता आम्ही शिवसेना पक्षावर मी नाराज नसून स्थानिक शिवसेना पक्षाच्या प्रमुख पदाधकारी यांच्या बाबतीत नाराज असल्याच म्हणत आहेत. सामान्य शिवसैनिक हा पक्षाची शक्ती असून त्या शक्तीचे खच्चीकरण करण्याचे पक्षातील काही लोक करत आहेत. पक्षवाढीसाठी कोणता ही योग्य कार्यक्रम हाती घेतला जात नाही तसेच पक्षाच्या हिताच्या भूमिका घेण्याऐवजी पक्षाला बाधक ठरतील अशा भूमिका कायमच घेतल्या जातात. आम्ही शिवसेना पक्षात असताना,काम करताना किंवा प्रवेश करताना सुद्धा शिवसेना हा एक ताकदीचा पक्ष म्हणून उभा होता मात्र स्थानिक तालुका नेतृत्वामुळे पक्षाचे संघटन विखुरले गेले असुन अनेक कार्यकर्ते हे नाराज झाले आहेत, असे बोलून दाखविले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT