Eknath Shinde-shivsena Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shivsena Convention : शिवसेनेत आता शिवसैनिकांच्या धर्तीवर ‘शिवदूत’; कोल्हापूरच्या अधिवेशनात होणार घोषणा

Rahul Gadkar

Kolhapur News : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उद्यापासून (ता. १६ फेब्रुवारी) कोल्हापुरात दोनदिवसीय अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात शिवसेनेत आता शिवसैनिकांच्या धर्तीवर ‘शिवदूत’ची स्थापना करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून पक्षवाढीसाठी आणि सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्याचा पक्षाचा प्रयत्न असणार आहे, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत यांनी दिली. (Shiv Sena will now establish Shiv Dut; Announcement will be made in Kolhapur convention)

शिवसेनेचे (शिंदे गट) उद्या (ता. १६ फेब्रुवारी) कोल्हापूर येथे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाची ‘यायला लागतंय’ अशी टॅगलाइन असणार आहे. कोल्हापुरात यापूर्वी आमचं ठरलं, तुमचं ठरलं, अशा टॅगलाइनखाली निवडणुका झाल्या आहेत. मात्र, आमचं पक्क ठरलं आहे, त्यामुळे आम्हाला काही चिंता नाही, असेही उद्योगमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ते म्हणाले, कोल्हापुरात उद्यापासून दोन दिवस शिवसेनेचे (शिंदे गट) अधिवेशन असणार आहे. उद्या दुपारी बारापासून या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कोल्हापुरात येऊन आईचा आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात करायचे. त्याच पद्धतीले आम्हीही आई अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन निवडणुकीच्या कामाची सुरुवात करत आहोत.

दरम्यान, या अधिवेशनात शिवसैनिकांच्या धर्तीवर शिवदूत असणार आहेत. ते शिवदूत संघटना बांधणीसाठी गावोगावी काम करणार आहेत. जनतेने कुठल्याही समस्यांसाठी या शिवदूतांशी संपर्क साधावा. त्यांच्या माध्यमातून या समस्यांचे निराकरण करण्यात येणार येईल, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

माजी मंत्री बबनराव घोलप यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने पक्षाची, तसेच महायुतीचीही ताकद वाढणार आहे. कोल्हापूर येथे होणाऱ्या अधिवेशनातही कोण कोणाचे पक्ष प्रवेश हे पाहा, असे सूचक विधानही शिवसेना नेत्याने केले.

कर्नाटकातील चिककोडी-गोकाक नवे जिल्ह्याच्या संदर्भात सामंत म्हणाले, कर्नाटकतील सीमाभागातील नागरिकांसोबत आम्ही नेहमी आहोत, पण हाच प्रश्न दुसऱ्या गटालाही विचारावा. काँग्रेसची विचाराधारा काय आहे, हे त्यांना पटवून द्या, असे सांगून उदय सामंत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेही यासंदर्भात बोट दाखवले.

Edited By : Vijay Dudhale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT