Pimpri Chinchwad News : नवीन तीन मजली इमारत झुकली; भाजप नेत्याचा गंभीर आरोप

Dangerous Building : दीड हजार कोटी रुपयांचा टीडीआर दिल्याचा आरोप झालेल्या वाकड भागातच ही इमारत पडण्याचा धोका निर्माण झाला.
Dangerous Building
Dangerous Buildingsarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad : बांधकाम पूर्ण झालेली तीन मजली इमारत धोकादायक स्थितीत पुढील बाजुस झुकली होती. या इमारतीच्या शेजारील इमारतीला देखील तडे गेले. या इमारतीचा धोका लक्षात घेत पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासाने घाईघाईने बुधवारी (ता. 14) ती पाडली. त्यातून जुन्याच नाही तर बांधकाम सुरु असलेल्या इमारतींचेही स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. (Pimpri Chinchwad News )

Dangerous Building
Ashok Chavan Join Bjp : मराठवाड्यासाठी भाजपचा मेगाप्लॅन, म्हणून अशोक चव्हाण झाले खासदार!

मोडकळीस आलेली जुनी इमारत पडली तर समजू शकतो.पण, पिंपरी-चिंचवडमध्ये बांधकाम सुरु असलेली नवी तीन मजली इमारत पडण्याचा धोका निर्माण झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दीड हजार कोटी रुपयांचा टीडीआर (TDR) दिल्याचा आरोप झालेल्या वाकड भागातच ही इमारत पडण्याचा धोका निर्माण झाला. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या खाबुगिरीचे असे अनेक ‘इमले’ शहरात बोगस परवानग्यांमुळे उभे राहिल्याचा आरोप भाजपचे अमोल थोरात यांनी केला.

झुकलेली इमारत पाडल्याचा खर्च ती बांधत असलेल्या बिल्डरकडून वसूल केला जाणार आहे, असे महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील भागवानी यांनी 'सरकारनामा'ला सांगितले. बांधकामात त्रुटी राहिल्यानेच ती झुकली. संबंधितावर फौजदारी कारवाई केली जाईल,असे देखील भागवानी म्हणाले.

अमोल थोरातांचा गंभीर आरोप

बांधकामाचे निकष पायदळी तुडवत महापालिका प्रशासनाने परवानगी दिल्यानेच अशी धोकादायक बांधकामे शहरात होत आहेत. महापालिकेला ही इमारत पाडावी लागली ही मोठी नामुष्की असून बांधकाम अभियांत्रिकी क्षेत्रासाठी लाजीरवाणी बाब आहे. याला पूर्णपणे महापालिका प्रशासन जबाबदार आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांचा संबंधित विभागावर वचक नसून त्यांच्याच संमतीने खाबुगिरीचे हे ‘इमले’उभारण्यात आल्याचा खळबळजनक आरोप अमोल थोरात यांनी केला. याप्रकरणी सबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील थोरात यांनी केली आहे.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com