Atpadi Politics : निधी अवघा दोन कोटींचा; श्रेयवाद रंगला सत्ताधाऱ्यांच्या दोन गटांत!

Babar Vs Padalkar News : आटपाडी शहरातील शुक्र ओढ्यावर संरक्षण भिंत बांधण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून दोन कोटी निधी मंजूर झाला आहे.
Anil Babar-Gopichand Padalkar
Anil Babar-Gopichand PadalkarSarkarnama
Published on
Updated on

Sangli News : खानापूर-आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांच्या मृत्यूनंतर अवघ्या पंधरा दिवसांतच निधीवरून आटपाडीत राजकारण तापले. आटपाडीतील शुक्र ओढ्याला जिल्हा नियोजन समितीतून दोन कोटींचा निधी मंजूर झाल्याने बाबर आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गटात श्रेयवाद उफाळला आहे. दोन्ही गटांकडून हा निधी आम्हीच मंजूर केल्याचा दावा करीत आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत दोन्ही गटांमध्ये चांगलीच टशन पहायला मिळण्याची शक्यता आहे. (Babar and Padalkar's group in Atpadi dispute over funds)

आटपाडी शहरातील शुक्र ओढ्यावर संरक्षण भिंतीची मागणी व्यापाऱ्यांनी केली होती. शुक्र ओढ्याला पूरपरिस्थिती निर्माण झाल्यावर व्यापारी वर्गाचे नुकसान होते. त्याबाबत सरंक्षण भिंतीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून दोन कोटी निधी मंजूर झाला आहे. याबाबत आमदार (स्व.) अनिल बाबर व आमदार गोपीचंद पडळकर यांनी मागणी केली होती. याबाबत दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांनी आपली भूमिका सोशल मीडियावर मांडल्याने श्रेयवाद रंगला आहे. (Atpadi Politics)

Anil Babar-Gopichand Padalkar
Jayant Patil : वजनदार नेते अजितदादांकडे, जयंतरावांची पुन्हा परीक्षा; पण...

शहरातील शुक्र ओढ्याला टेंभू योजनेतून पाणी सोडले जाते. ओढ्याचे पात्र मोठे व पसरट असून दोन्ही बाजूला बाजारपेठ आहे. सन 2019 मध्ये अतिवृष्टीवेळी बाजारपेठेत पाणी गेल्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले होते. ते टाळण्याची मागणी केली जात होती. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मे महिन्यात, तर आमदार (स्व.) अनिल बाबर यांनी नोव्हेंबर महिन्यात मागणी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी 2 कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे.

बाबर गटाचे नेते आणि जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांनी स्वर्गीय अनिल बाबर यांनी अखेरच्या क्षणी पाठपुरावा केल्याने आटपाडीतील ओढ्याच्या संरक्षक भिंतीसाठी 2 कोटीचा निधी मंजूर झाल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, पडळकर गटाचे व भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रयत्नांमुळे निधी मंजूर झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे दोन्ही गट निधीवरुन आक्रमक झाल्याचे दिसून आले.

Anil Babar-Gopichand Padalkar
Raju Shetty : शेतकऱ्यांची थकबाकी द्या अन्यथा... ; राजू शेट्टी यांचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com