Eknath Shinde, Rajesh Kshrisagar
Eknath Shinde, Rajesh Kshrisagar sarkranama
पश्चिम महाराष्ट्र

Shivsena : सातारा लोकसभेसाठी शिवसेना सक्षम उमेदवार देणार... राजेश क्षीरसागर

Umesh Bambare-Patil

Satara News : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath shinde यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात पक्ष बांधणीचे काम हाती घेतले असून त्यानुसार पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात येत आहेत. जिल्ह्यात शिवसेनेला Shivsena चांगले वातावरण असल्यामुळे आगामी काळात सातारा शिवसेनेचा जिल्हा होऊ शकतो. जागा वाटपचा निर्णय झाल्यानंतर शिवसेना सातारा लोकसभेसाठी सक्षम उमेदवार देईल, असा विश्वास शिवसेनेचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर Rajesh Kshrisagar यांनी व्यक्त केला.

श्री. क्षीरसागर आज साताऱ्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नियोजन समितीचा आढावा घेतल्यानंतर शासकिय विश्रामगृहात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव, पुरुषोत्तम जाधव, जयवंत शेलार उपस्थित होते.

राजेश क्षीरसागर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली राज्यभर शिवसेनेने पक्ष बांधणीचे काम हाती घेतले असून माझ्याकडे सातारा लोकसभेची जबाबदारी दिली आहे. जिल्ह्यात शिवसेनेची भक्कम बांधणी असून यापूर्वी जावळीतून सदाभाऊ सपकाळ तसेच हिंदूराव नाईक निंबाळकर हे शिवसेनेचे पहिले खासदार झाले होते. त्यांच्यानंतर आता शंभूराज देसाई व महेश शिंदे हे दोन आमदार जिल्ह्यात आहेत.

त्यामुळे संघटना बांधणी चांगल्या पद्धतीने होणार आहे. आगामी काळात सातारा शिवसेनेचा जिल्हा होऊ शकतो. मागील महिन्यात जिल्ह्यातून शिवसेनेत इनकमिंग झाले आहे. अर्थसंकल्पातही साताऱ्याला झुकते माप मिळाले आहे. आगामी काळात देशाला महासत्ता बनवणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न असून त्यासाठी त्यांनी निती आयोगाची स्थापना केली आहे. देशाची अर्थव्यवस्था २०२४ पर्यंत एक लाख मिलियन डॉलर करण्याचे ध्येय त्यांनी ठेवले आहे.

सध्या जनता शिवसेनेच्या पाठीशी असून आगामी काळात शिवसेना व भाजप एकत्र काम करणार आहे. लोकसभेला उमेदवारी कोणाला द्यायची हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ठरवतील. माझे काम संघटना बांधणीचे असून उमेदवार ठरविण्याचे नाही, असे सांगत त्यांनी देसाईंना उमेदवारी दिली जाणार का या प्रश्नावर बोलणे टाळले.

आगामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांनी वक्तव्य केले आहे. याबाबत विचारले असता राजेश क्षीरसागर म्हणाले, सध्यातरी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असून आगामी मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांनाच पाहत आहोत. पुढचे पुढे पाहू, याबाबत भाजपकडून कोणाही दगा फटका होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. शिवसनेचे कुटुंब मोठे आहे, त्यामुळे पूर्वीचे संपर्क प्रमुख यांना एकत्र करुन त्यांना ताकत देण्याचे काम मी करणार आहे.

बानुगडेंच्या व्याख्यानाची गरज नाही....

आगामी काळात नितीन बानुगडे पाटील यांना शिवसेनेत घेतले जाणार का, या प्रश्नावर राजेश क्षीरसागर म्हणाले, व्याख्याने देऊन पक्ष वाढत नाही. जिल्ह्याला बानुगडे यांच्या व्याख्यानाची गरज नाही. कारण आज आमच्याकडे अनेक शिलेदार आहेत,असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT