Sujay Vikhe Patil  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shivsena News : शिवसेनेच्या महिला नेत्यानं सुजय विखेंना झापलं; म्हणाल्या, 'अन्नदान अन् भीक यातला फरकच ज्या लोकांना...'

Neelam Gorhe Statement : बीड प्रकरणांमध्ये अनेक तक्रारी पुढे येत आहेत. अनेकांच्या भावना देखील तीव्र असतात. जर आवश्यकता असेल तर त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृह विभाग योग्य ती कारवाई करेल.

Rahul Gadkar

Kolhapur News : भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील शिर्डीतील साईबाबा संस्थानकडून भक्तांना दिल्या जात असलेल्या मोफत अन्नदानावरुन आक्षेपार्ह विधान केलं आहे. त्यांनी 'संस्थानकडून मोफत अन्नदान करण्यात येते, त्यामुळे अख्या देश येऊन जेवून जातो. महाराष्ट्रातील सगळे भिकारी शिर्डीत जमा होतात,हे योग्य नाही.', असे विधान केल्यानं विखेंविरोधात संतापाची मोठी लाट उसळली आहे.आता राजकीय नेतेमंडळींनी विखे यांना खडेबोल सुनावलं असतानाच आता विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनीही सुजय विखेंना झापलं आहे.

विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे या सोमवारी(ता.6) कोल्हापुरात आल्या होत्या. यावेळी त्यांनी भाजप खासदार सुजय विखेंवर (Sujay Vikhe Patil) जोरदार शाब्दिक हल्ले चढवले. त्या म्हणाल्या,भिकारी हा शब्द शिवीसारखा आहे तो कोणीच वापरू नये, कोणी कोणाकडे खासदारकी मागत असेल, तर त्याला भिकारी म्हणावं का? कोणी कोणाकडे अजून सहकार्य मागतो, त्याला भिकारी म्हणावं का? असा खडासवालही त्यांनी यावेळी केला.

मुळामध्ये अन्नदान आणि भीक यातील फरकच ज्या लोकांना कळत नाही, ते सुसंस्कृत आणि त्यांना काही अस्तित्व आहे, असं मला वाटत नाही. यामुळे त्यांची देवाबद्दलची श्रद्धा त्यांनाच लखलाभ होवो, अन्नदानाच्या मागे मोठी प्रेरणा आहे.अन्नदानाला भीक म्हणणं हे मला योग्य वाटत नाही, असा खोचक टोला गोऱ्हे यांनी लगावला.

कोविडच्यावेळी ज्या दक्षता घेत होतो, त्याच दक्षता यासाठी घ्याव्या लागतील. या आजारासाठी नेमकी कोणती तपासणी करावी लागते हे मात्र अजून स्पष्ट नाही. मी स्वतः आरोग्यमंत्री आणि आरोग्य संचालकांकडे विचारणा करणार आहे. या आजारामुळे मृत्यूचे प्रमाण नगण्य नसल्याची माहिती आहे. या व्हायरसबाबत डब्ल्यूएचओ स्पष्टता देईल. त्याप्रमाणे आपण पुढे पालन करू, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली.

कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात मध्ये मोठ्या प्रमाणावरती मुलींचं अपहरण होण्याचा प्रकार समोर आले आहे. यातील 50 टक्के मुली अद्यापही बेपत्ता आहेत. ज्या कारणामुळे मुलगी निघून गेली, त्या कारणापर्यंत जाण्याचा पोलिसांनी प्रयत्न करावा. अशा मुलींची प्रशासनाने खबरदारी आणि काळजी घेतली पाहिजे. मुली बेपत्ता होण्याच्या कारणांवर पोलिसांनी काम करावं.

पोक्सो गुन्ह्यात तपास करताना पोलिसांनी साध्या वेशात, कमी संख्येने, गोपनीय पद्धतीने पीडित मुलीकडे जावे. प्रत्येक पीडितेच्या कुटुंबीयांना केसची प्रगती सांगितली पाहिजे. प्रत्येक शाळेत गुड टच बाबत प्रबोधन व्हावं, असही गोऱ्हे म्हणाल्या.

बीड प्रकरणांमध्ये अनेक तक्रारी पुढे येत आहेत. अनेकांच्या भावना देखील तीव्र असतात. जर आवश्यकता असेल तर त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृह विभाग योग्य ती कारवाई करेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT