Santosh Deshmukh Murder Case : समाज आधीच अस्वस्थ; त्यात खासदारांबद्दल पोलिस अधिकाऱ्याने केलेल्या टिपण्णीची भर...

Police officer Comment On MP Bajrang Sonawane : महाराष्ट्र अस्वस्थ आहे, हवालदिल आहे. सरपंच संतोष देशमुख यांचा खून आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कोठतील मृत्यू हे त्यासाठी कारणीभूत ठरले आहेत. देशमुख यांच्या हत्येनंतर राजकीय, सामाजिक गुंतागुंत वाढली आहे. त्यातच एका पोलिस अधिकाऱ्याने बीडच्या खासदरांबद्दल ‘व्हॉट्स ॲप’ ग्रुपवर केलेली टिपण्णी चिंता वाढवणारी आहे.
Bajrang Sonawane-Santosh Deshmukh
Bajrang Sonawane-Santosh Deshmukh Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : प्रचंड असे बहुमत मिळवून सत्तेवर आलेल्या महायुती सरकारसमोर संकटांची मालिका निर्माण झाली आहे. विरोधकांचा आवाज क्षीण होणे, सत्ताधारी नेत्याचेच अन्यायकारक घटनांवर आवाज उठवणे, यामुळे सरकारला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मराठवाड्यातील परभणी, बीड जिल्ह्यातील घटना आणि त्यानंतरच्या घडामोडींमुळे सरकार आणि काही नेते संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. या दोन्ही घटनांच्या विरोधात आवाज उठवण्यात सत्ताधारी नेतेही आघाडीवर आहेत.

परभणीत सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचा अत्यंत क्रूर पद्धतीने खून करण्यात आला. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय, परळीचे माजी नगराध्यक्ष वाल्मिक कराड याचे नाव आले. पोलिसांच्या भूमिकेवरही सातत्याने आक्षेप घेण्यात आला.

बीडचे खासदार बजरंग सोनवणे (MP Bajrang Sonawane ) यांनी हा प्रश्न केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर मांडत दोन पोलिस अधिकाऱ्यांचे कॉल रेकार्ड तपासण्याची मागणी केली. यापैकी एका पोलिस अधिकाऱ्याने पत्रकारांसाठीच्या व्हॉटस ॲप ग्रुमध्ये सोनवणे यांच्याबाबत आक्षेपार्ह टिपण्णी केली.

मी प्रेस कॉन्फरन्स घेतली, तर खासदाराची चड्डी जागेवर राहणार नाही..., अशी पोस्ट त्या पोलिस अधिकाऱ्याने ग्रुपवर टाकली होती. त्याला ग्रुपमधून काढून टाकण्यात आले, त्याची बदलीही करण्यात आली आहे. वातावरण किती गढूळ झाले आहे, हे या पोलिस अधिकाऱ्याने खासदारांवर केलेल्या टिपण्णीवरून लक्षात येईल. या दोन प्रकरणांनंतर सामाजिक, राजकीय गुंतागुंत प्रचंड वाढली आहे. पोलिस आणि राजकीय नेत्यांचे 'नेक्सस' समोर येत आहे. काही पोलिस अधिकारी राजकीय नेत्यांसमोर किती हतबल झाले आहेत, हेही समोर येत आहे.

Bajrang Sonawane-Santosh Deshmukh
Mahayuti News : ...तर आम्ही स्वबळावर निवडणुका लढवू; महायुतीमधील बड्या नेत्याने दिला इशारा

गेल्या अडीच वर्षांपासून राज्यात महायुतीचे सरकार आहे. गृह मंत्रालय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्या अर्थाने या परिस्थितीला ते जबाबदार आहेत, असे बोलण्याचे धाडस विरोधी पक्षांनी गमावल्याचे दिसत आहे. सरपंच देशमुख यांच्या हत्येला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात वाचा फोडली. त्यांनी सभागृहात वाल्मिक कराड याचे नाव घेतले. भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही सभागृहात हा मुद्दा उचलला, मात्र त्यांनी थेट नाव घेतले नव्हते.

देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. त्या पथकात वाल्मिक कराड याच्याशी जवळीक असलेल्या काही पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे, असा आरोप आमदार आव्हाड यांनी केला. त्यानंतर संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना एसआयटीमधून बाहेर काढण्यात आले. ते कराड याचे निकटवर्तीय आहेत, हे त्यांचा एसआयटीत समावेश करणाऱ्यांना माहित नव्हते, असे कसे म्हणता येईल? त्यामुळे गुंतागुंत वाढली आहे, संभ्रमही वाढला आहे.

सुरेश धस आहे बीड जिल्ह्यातील आष्टीचे भाजपचे आमदार आहेत. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी राज्यात विविध ठिकाणी काढल्या जाणाऱ्या मोर्चांमध्ये ते सहभागी होत आहेत. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी ते सभांमधून करत आहेत आणि तिकडे, एसआयटीमध्ये मात्र कराड याच्या निकटवर्तीय पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश केला जात आहे. पत्रकारांसाठी असलेल्या व्हॉट्स ॲप ग्रुपवर पोलिस अधिकारी खासदाराला धमकावत आहेत.

Bajrang Sonawane-Santosh Deshmukh
Sudhir Mungantiwar : ...तेव्हाच मी राजकारण सोडण्याचा विचार केला होता; मुनगंटीवारांनी बोलून दाखवली मनातील गोष्ट

म्हटले तर परिस्थिती गंभीर आहे, म्हटले तर गंभीर नाही. मतदारांनी महायुतीला केवळ स्पष्ट नव्हे, तर प्रचंड बहुमत दिले आहे. थोडेसे खट्ट झाले तरी पूर्वीचे मंत्री, मुख्यमंत्री राजीनामे देत असत. आज तशी परिस्थिती आहे का? काहीही झाले तरी सत्ता सोडायची नाही, अशी पद्धत रूढ झाली आहे. ती जवळपास सर्वांनाच लागू होते. सरपंच देशमुख यांचा ज्या कारणासाठी, ज्या पद्धतीने खून झाला, त्यामुळे महाराष्ट्र हादरून गेला आहे. त्यानंतर गुंतागुंत प्रचंड वाढली आहे. लोक हवालदिल झाले आहेत. सरकारची जबाबदारी आहे लोकांना दिलासा देण्याची. सरकार हे करणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com