Bachchu Kadu : भाजपविषयी खरं मत ऐकायचंय, तर शिंदे अन् अजितदादांची 'नार्को टेस्ट' करा; बच्चू कडूंनी महायुतीला डिवचलं

BJP Eknath Shinde ShivSena Ajit Pawar NCP Party Mahayuti Prahar Janshakti Party Bachchu Kadu : प्रहार जनशक्ती संघटनेचे बच्चू कडू यांनी महायुतीतील पक्षांच्या मैत्रीवर निशाणा साधताना मोठं विधान केले आहे.
Bachchu Kadu  4
Bachchu Kadu 4Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महायुतीला विधानसभा निवडणुकीत प्रचंड असे, बहुमत मिळालं आहे. तब्बल 237 जागांवर यश मिळालेल्या महायुतीत सत्ता स्थापनेवेळी, मंत्रिमंडळ विस्तारावेळी नाराजीनाट्य रंगलं होतं. आता महायुती सरकारमध्ये पालकमंत्रीपदाच्या नियुक्त्या नाहीत.

महायुतीत असलेल्या भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सर्व काही अलबेल, असे नाही. हाच धागा पकडत प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी महायुतीमधील या तिन्ही पक्षावर निशाणा साधला आहे.

प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांनी अजित पवार, एकनाथ शिंदे यांना टोला लगावताना भाजपवर देखील निशाणा साधला. ते म्हणाले, "मित्रपक्ष फक्त दिसायला युतीत आहे. मात्र शिंदे आणि दादांची नार्को टेस्ट केली, तर भाजपबद्दल त्यांचं खरं मत समोर येईल". दरम्यान, बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण अभियान अध्यक्षपदाचा शनिवारी राजीनामा दिला. बच्चू कडू यांनी राजीनामा देताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिले. यात कठोर शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे.

Bachchu Kadu  4
Chhagan Bhujbal : 'पर्दे में रहने दो...'; पवारांच्या 'त्या' लेखी संदेशाला भुजबळांकडून 'राजकीय फोडणी'

बच्चू कडू यांनी भाजप पुन्हा उद्धव ठाकरेंबरोबर (Uddhav Thackeray) जाऊ शकतो, असे देखील भाकित वर्तवलं. भाजपचं शिंदे आणि दादांसोबत बिनसल्यावर ठाकरे आणि भाजप पुन्हा एकत्र येऊ शकतात. युतीमध्ये जो पक्ष मोठा व्हायला लागतो, त्याला भाजप संपवतो, असाही आरोप केला.

Bachchu Kadu  4
Akhilesh Kumar : IPS अखिलेश कुमार यांची युपीच्या DIG पदी नियुक्ती..!

‘अजित पवार आणि एकनाथ शिंदेंसोबत जर भाजपचा प्रेमभंग झाल्यास उद्धव ठाकरेंसोबत त्यांचा नवीन प्रेमाची 'कहानी' सुरू होऊ शकते. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट, त्याचाच एक प्रयत्न होता, असे मला वाटते, असेही बच्चू कडू यांनी म्हटले.

'भाजप नेहमी म्हणते, मोठ्या माश्याखाली नेहमी लहान मासे असतात. तो मोठ्या माशाला थोडं थोडं खात असतो आणि मग एक दिवस, असा येतो की लहान मासा हा मोठा होतो आणि मग त्याला पूर्ण नष्ट करतोय, अशीच भाजपची राजकारणाची नीती आहे’, असेही बच्चू कडू यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com