Sanjay Gaikwad Over Govind Pansare and Shivaji Kon hota book sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maharashtra Politics : आमदार संजय गायकवाड यांना सणसणीत चपराक : राड्यानंतर 'शिवाजी कोण होता' पुस्तकाने घडवला आणखी एक इतिहास

Shivaji Kon Hota Book Controversy Sanjay Gaikwad Threat Case : 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाच्या नावावरून वाद निर्माण झाला असून शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Aslam Shanedivan

  1. ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाच्या नावावरून वाद निर्माण झाला असून आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

  2. प्रकाशकाला धमकी दिल्याच्या प्रकरणामुळे पुस्तक पुन्हा चर्चेत आले आहे.

  3. वादामुळे केवळ चार दिवसांत १० हजारांहून अधिक प्रती विकल्या जाऊन पुस्तकाची मागणी प्रचंड वाढली आहे.

Kolhapur News : 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाच्या नावावरून वाद निर्माण झाल्यानंतर कोल्हापूरसह राज्याच्या विविध भागात डाव्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात आंदोलन केले आहे. तर आज मंगळवारी (ता.२८) शेतकरी कामगार पक्षासह इतर संघटना बुलढाण्यात गायकवाड यांच्याविरोधात आंदोलन करत आहे. यामुळे या पुस्तकाविषयी पुन्हा उत्सुकता निर्माण झाली असून राज्याच्या सर्वच भागांतून त्याला प्रचंड मागणी वाढली आहे. गेल्या चार दिवसांत दहा हजारांवर प्रती खपल्या असून त्या संपताच नव्याने छपाई सुरू करण्यात आली आहे. यामुळे पुस्तक हातात येताच फाडा म्हणणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांना सणसणीत चपराक असल्याचे बोलले जात आहे.

ज्येष्ठ कामगार नेते कॉ. दिवंगत गोविंद पानसरे यांनी लिहलेल्या 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाच्या नावावरून नव्याने वाद निर्माण झाला आहे. पानसरे यांनी सन १९८८ मध्ये ७२ पानांचे 'शिवाजी कोण होता?' हे पुस्तक ज्याचे प्रकाशन 'लोकवाङ्मय' या संस्थेने केले. तेव्हा किंमत पाच रुपये होती. तर या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराजांची वेगळी प्रतिमा अतिशय कमी शब्दांत मांडण्यात आली आहे.

यामुळे वाचकांचा प्रचंड प्रतिसाद या पुस्तकाला मिळाला. या पुस्तकाच्या आतापर्यंत ११५ पेक्षा अधिक आवृत्त्या प्रकाशित झाल्या असून, ३८ वर्षात वीस लाखांपेक्षा अधिक प्रतीची विक्री झाली आहे. विविध २४ भाषांत या पुस्तकाचा अनुवाद झाला असून हे पुस्तक बेस्ट सेलर ठरले आहे.

दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी हे प्रकरण पुन्हा एकदा उकरून काढले आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख कदापी खपवून घेणार नाही असे म्हणत या पुस्तकाला विरोध केला आहे. तसेच 'साऊ प्रकाशन'चे प्रशांत आंबी यांना पुस्तकाचे नाव बदलण्यासाठी अश्लील शिवीगाळी करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. ज्यानंतर आता राज्यभर नवा वाद निर्माण झाला असून गायकवाड यांच्याविरोधात डावे मैदानात उतरले आहेत. तर काही संघटना गायकवाड यांच्या समर्थमानार्थ उतरले असून त्यांनी या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

गायकवाड यांच्या विरोधानंतर आणि त्यांनी दिलेल्या धमकी आणि अश्लील शिवीगाळनंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण आता दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी प्रकाशन प्रशांत आंबी यांच्यासह शेतकरी कामगार पक्षासह इतरांनी लावून धरली आहे. ज्यामुळे हे प्रकरण आता राज्यभर चर्चेत आले आहे.

तर राज्यभर हा विषय चर्चेत आल्याने हे पुस्तक पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले. यामुळे या पुस्तकाविषयी पुन्हा उत्सुकता निर्माण होऊन त्याला मागणी वाढली. राज्यभरातून प्रकाशकाकडे चौकशी सुरू झाली. गेल्या चार दिवसांत दहा हजारांवर प्रती खपल्या आहेत. तर प्रती संपल्याने तातडीने या पुस्तकाची छपाई साऊ प्रकाशन संस्थेच्या वतीने जसेच्या तसे प्रकाशिक केले जात आहे.

गेल्या चार दिवसांत या पुस्तकाला प्रचंड मागणी वाढ झाली असून एक हजार, दोन हजार अशा ऑर्डर येत आहेत. पण, सध्या सर्व पुस्तके संपल्याने नव्याने छपाई सुरू करण्यात येत असल्याची माहिती प्रकाशक प्रशांत आंबी यांनी दिली आहे.

FAQs :

1. ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकावर वाद का निर्माण झाला?
पुस्तकाच्या नावावरून आक्षेप घेतल्यामुळे वाद निर्माण झाला.

2. संजय गायकवाड यांच्यावर कोणता आरोप आहे?
त्यांनी प्रकाशकाला नाव बदलण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

3. या वादाचा पुस्तकाच्या विक्रीवर काय परिणाम झाला?
वादामुळे पुस्तकाची मागणी वाढली आणि चार दिवसांत १० हजार प्रती विकल्या गेल्या.

4. प्रकरण पोलिसांपर्यंत का गेले?
धमकीच्या घटनेमुळे प्रकाशकाने तक्रार केल्याने प्रकरण पोलिस ठाण्यात गेले.

5. या घटनेमुळे काय चर्चा सुरू आहे?
वादामुळे पुस्तक अधिक लोकप्रिय झाले आणि त्याने विक्रीचा नवा विक्रम केला अशी चर्चा सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT