Sanjay Gaikwad controversy : एकनाथ शिंदेंच्या गायकवाडांविरोधात पँथर सेना मैदानात; 'बुलढाण्यात शिवीगाळ परिषद घेणार' (Video)

At an Ambedkar Jayanti event in Satara, All India Panther Sena chief Deepak Kedar warns of holding an abusive protest meeting against MLA Sanjay Gaikwad in Buldhana : शिवाजी कोण होता? या पुस्तकांचे प्रकाशकाला केलेल्या शिवीगाळवरून आमदार संजय गायकवाड चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
Sanjay Gaikwad controversy
Sanjay Gaikwad controversySarkarnama
Published on
Updated on

Buldhana political news : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी 'कोण होता शिवाजी?' पुस्तकाचे प्रकाशक प्रकाश आंबी यांना फोन करुन अश्लील भाषेत शिवीगाळ आणि धमकी दिली होती. संजय गायकवाड यांनी अतिशय अर्वाच्या भाषेत प्रकाश आंबी यांना फोनवर दमदाटी केली. त्यांच्या फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप सर्वत्र व्हायरल झाली होती.

या शिवीगाळीचा चौहूकडून निषेध होत असताना, ऑल इंडिया पँथर सेना आमदार गायकवाड यांच्याविरोधात मैदानात उतरली आहे. पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी बुलढाणा इथं शिवीगाळ परिषद घेण्याचा इशारा दिला आहे. पँथर सेनेच्या या इशाऱ्यामुळे आमदार गायकवाड यांच्याविरोधात वातावरण अधिकच तापणार, असे दिसतं आहे.

बुलढाणा (Buldhana) इथं राजकीय वातावरण तापले असून, ऑल इंडिया पँथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक केदार यांनी आमदार गायकवाड यांना अनोख्या शैलीत इशारा दिला आहे. बुलढाणा इथं थेट शिवीगाळ परिषद घेणार असल्याचं म्हटलं आहे. दीपक केदार यांनी थेट आमदार गायकवाड यांना अंगावर घेतल्यानं आगामी काळात राजकीय वातावरण अधिक तापणार, असे दिसत आहे.

दीपक केदार म्हणाले, "प्रकाश आंबी यांना कोल्हापूर इथं भेट घेणार आहे. मला म्हणे, तुला तलवारीनं कापतो, पानसरेंकडे पाठवील, तुझ्या आईला.... तुझ्या बायको..., पाहा ही संस्कृती एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आमदाराची, गृहमंत्री झोपलेत का?" फोनवर बोलताना, समोरच्यांनी संयम बाळगला, 13 मिनिटाच्या संभाषणात, त्यानं एकही शिवी दिली नाही. नाहीतर सर्व नामदेव ढसाळच होता त्याच्याकडे. आमच्याकडे एवढ्या शिवी आहे की, बस्स! एक दिवस बुलढाण्यातच शिवीगाळ परिषद घ्यावी, असे घणाघात केला.

Sanjay Gaikwad controversy
Shiv Sena Crisis : शिंदेसेनेचे आमदार-खासदार आमच्याही संपर्कात! ठाकरेंच्या शिलेदाराचा दावा, राजकारणात खळबळ

'शिव्यांनी मरून जातील हे, आमच्या दोन-तीन बायका कामाला लावल्या ना, नुसता विचार करता-करता, अर्थ काढता-काढता हे मरून जातील. शिवीची भाषा आम्हाला शिवकवणार, संजय गायकवाड आम्हाला शहाणपणा शिकवणार?' असे प्रश्न दीपक केदार यांनी केले.

Sanjay Gaikwad controversy
Prajakt Tanpure Rahuri Bypoll Result : मतदानाचा घसरलेला टक्का, प्राजक्त तनपुरेंचा समर्थकांना 'तो' निरोप; निकालाआधीच राहुरीत 'धडधड' वाढली!

“आमचं आणि शिव्यांचं नातं खूप जुनं आहे. गरज पडली, तर बुलढाण्यात शिवीगाळ परिषद आयोजित करू.” या परिषदेत शिव्यांचा अर्थ समजून घेताच विरोधकांचा खेळ गुंडाळला जाईल,” असा टोला देखील दीपक केदार यांनी लगावला आहे.

प्रकाश आंबी यांची तक्रार

दरम्यान, प्रकाशक प्रकाश आंबी यांचे वकील म्हणून, असीम सरोदे मैदानात आले आहेत, कोल्हापूर इथल्या राजारामपुरी पोलिस ठाण्यात आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत आमदार गायकवाड यांनी फोनवरून प्रकाश आंबी यांना दिलेल्या शिवीगाळीचा उल्लेख केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखील यात अपमान झालेला दिसतो आहे.

सरोदेंचे फडणवीस अन् शिंदेंना चिमटे

या तक्रारीवर पोलिस अधिकाऱ्यांनी विधी अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन गुन्हा नोंदवितो, असं म्हटलं आहे. पोलिसांच्या या भूमिकेवर असीस सरोदे यांनी, राज्याचे मुख्य विधी अधिकारी Devendra Fadnavis आणि BJP Maharashtra हेच आहेत, असा टोला लगावत, ते काय ठरवितात ते बघू. पण आमदार हा एकनाथ शिंदे शिवसेनेचा आहे, ही एक बाब मुख्य विधी अधिकाऱ्यांसाठी महत्वाची ठरू शकते, असे अॅड. असीम सरोदे यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com