Udayanraje Bhonsle, Shivendraraje Bhonsle Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shivendraraje Bhonsle : आधी शेजारी-शेजारी बसले, नंतर डिवचले; शिवेंद्रराजे उदयनराजेंना काय म्हणाले?

Vishal Patil

Satara Political News : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सोलापुरातून झाले. त्या कार्यक्रमासाठी भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले शेजारी-शेजारी बसले होते. या उद्घाटनानंतर काही वेळांतच आमदार शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना डिवचले. तसेच पालिकेतील सत्ताधारी सातारा विकास आघाडीवर टीका केली.

अमृत 2.0 योजनेअंतर्गत पंतप्रधान मोदींच्या हस्ते कास धरण पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ झाला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle), आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, नगरपालिका मुख्याधिकारी अभिजित बापट उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर झालेल्या कामाच्या उद्घाटनावरून शिवेंद्रराजेंनी, उदयनराजेंवर निशाणा साधला आहे.

सातारकरांना पाणीपुरवठा करणारी योजना सत्तारूढ पदाधिकाऱ्यांच्या काळात नाही तर प्रशासकाच्या काळात पूर्ण झाली आहे. सगळे माजी झाल्यानंतर काम पूर्ण झाल्याचे म्हणत त्यांनी उदयनराजेंना टोलाच लगावला.

सातारा नगरपालिकेत खासदार उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडीची सत्ता होती. त्यांच्याविरोधात आमदार शिवेंद्रराजेंची (Shivendraraje Bhonsle) नगर विकास आघाडी होती. गेल्या पाच वर्षांमध्ये या दोन्ही आघाडीमधील नगरसेवक, तसेच नेते यांच्यात कुरघोडीचे राजकारण पाहायला मिळाले. अनेकदा टोकाचे वादही सातारकरांनी अनुभवले आहेत. दोन्ही राजे पूर्वी राष्ट्रवादीत होते, आता दोघेही भाजपमध्ये आहेत, मात्र स्थानिक पातळीवरील सातारा नगरपालिकेत आमने-सामने पाहायला मिळतात.

सत्तारूढ आघाडीकडून दिरंगाई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर आमदार शिवेंद्रराजेंनी सत्तारूढ सातारा विकास आघाडीनेही योजना पूर्ण करण्यास दिरंगाई केल्याचा आरोप केला. आतापर्यंत हा निधी येऊन कासचे पाणी सातारकरांच्या नळालाही आले असते. मात्र, नियोजन नसल्यामुळे हा सर्व विलंब झाला आहे. शेवटी प्रशासकाच्या काळात हे काम पूर्णत्वास जात आहे. नगरपालिकेत निवडून दिलेल्या नगरसेवकांना हे काम करता आलेले नाही. या ठिकाणी मी ऐकत होतो. माजी अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष असे सगळे ऐकत होतो. तेव्हा सगळे माजी झाल्यानंतर काम पूर्ण होतेय, हे दुर्दैवी आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

साडेचार कोटी वीजबिलाची बचत

कास योजनेच्या कामामुळे विलासपूर, शाहूनगर आणि संपूर्ण सातारा (Satara) शहराला पाणी पुरवठा होणार आहे. सातारा नगरपालिकेचे 4.5 कोटींची विजेची बचत होणार आहे. ही योजना 27 किलोमीटरची जलवाहिनी आहे. या योजनेमुळे दहापटीने पाण्याचा साठा पाहायला मिळत आहे. कुठल्याही परिस्थितीत पाण्याची कमतरता होऊ नये, याची दक्षता घेण्यात येणार आहे. तसेच ही योजना पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अनेकांनी मदत केल्याचे छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले.

(Edited by Sunil Dhumal)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT