Satara Political : उपमुख्यमंत्री फडणवीस आज जिल्हा दौऱ्यावर ; लोकसभेच्या पार्श्वभूमीवर कोणती घोषणा करणार ?

Loksabha Election : संभाव्य उदयनराजे भोसले, रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांच्या उमेदवारीबाबत देणार हिरवा कंदील ?
Ranjitsinh Naik-Nimbalkar, Devendra Fadnavis, Udayanraje Bhosale
Ranjitsinh Naik-Nimbalkar, Devendra Fadnavis, Udayanraje BhosaleSarkarnama
Published on
Updated on

Satara Political : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज बुधवारी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते कराड आणि फलटण येथील कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे जिल्ह्यात वाहत असताना फडणवीस दौऱ्यावर येत आहेत. यानिमित्ताने सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीची घोषणा करतील काय ? असा प्रश्न संभाव्य उमेदवारांबरोबरच जिल्हावासियांना पडला असून त्यांची उत्सुकता ताणली आहे.

जिल्ह्यात झालेल्या महायुतीच्या मेळाव्यानंतर प्रथमच फडणवीस सातारा जिल्ह्यात येत असून, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. कराड येथे भाजपचे डॅा. अतुल भोसले यांनी कृष्णा कृषी व औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी 12 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

Ranjitsinh Naik-Nimbalkar, Devendra Fadnavis, Udayanraje Bhosale
Sushilkumar Shinde: सुशीलकुमार शिंदेंची 'चाय पे चर्चा';चंद्रकांतदादा शिंदेंची घेणार भेट

तर दुपारी 3 वाजता फलटण येथे खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या नीरा - देवघरच्या बंदिस्त पाइपलाइनच्या कामाचा प्रारंभ तसेच तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपुजन व उद्घाटन फडणवीस करणार आहेत. कराड येथील कार्यक्रम सातारा लोकसभा मतदारसंघात होत आहे तर फलटण येथील कार्यक्रम माढा लोकसभा मतदारसंघात होत आहे.

त्यामुळे फडणवीस हे एकाच वेळी सातारा आणि माढा या दोन लोकसभा मतदारसंघांचा दौरा करणार असल्याने येथील लोकसभेच्या उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता असून त्याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. सातारा व माढा लोकसभा मतदारसंघात मोदींच्याच विचाराचा खासदार होईल असा निश्चय दोन दिवसांपूर्वी येथील गांधी मैदानावर झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात करण्यात आला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दोन्ही मतदारसंघात महायुतीने आपली ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे येथील निवडणूक महायुतीने प्रतिष्ठेची करुन ठेवली आहे. अद्याप उमेदवारी जाहीर झाली नसली तरी इच्छूकांनी मात्र दंड थोपटले आहेत. साताऱ्यासाठी उदयनराजे भोसले आणि माढासाठी रणजितसिंह नाईक - निंबाळकर हे संभाव्य उमेदवार आहेत.

दोघांनीही यासाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडे फिल्डिंगदेखील लावली आहे. आता फक्त उमेदवारीची घोषणा बाकी आहे, तर जिल्हा दौऱ्यावर येत असलेले उपमुख्यमंत्री फडणवीस या दोन्ही नावांची घोषणा करतील की काय असा सवाल सर्वांच्याच मनात उपस्थित झाला आहे. जिल्ह्यातील दोन्ही कार्यक्रम राजकीय पार्श्वभूमीवर आखण्यात आल्याची चर्चा आहे.

Ranjitsinh Naik-Nimbalkar, Devendra Fadnavis, Udayanraje Bhosale
Gopichand Padalkar: शिंदेंनी घरकोंबडा व्हायचं का..."; उद्धव ठाकरेंवर पडळकरांचे टीकास्त्र

डॅा. अतुल भोसलेंची साखरपेरणी...

कराड येथील कृष्णा उद्योग समूहाचे डॅा. अतुल भोसले हे देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक असलेले भाजपचे नेते आहेत. ते कराड दक्षिण मतदारसंघात आगामी विधानसभेसाठी इच्छूक आहेत. तर त्यांनी कराड तालुक्यात फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करुन कोट्यावधींचा निधी मंजूर करुन आणला आहे. त्यांनी आज कराडमध्ये घेतलेले कृष्णा कृषी व औद्योगिक प्रदर्शन याच पार्श्वभूमीवर घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे या माध्यमातून आतापासूनच भोसलेंची साखरपेरणी सुरु असल्याचे चित्र आहे.

फडणवीस यांचा दौरा...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजभवन येथून हेलिकॉप्टरने निघून सकाळी पावणेबारा वाजता त्यांचे कराड विमानतळावर आगमन होणार आहे. तेथून मोटारीने ते शिवाजी महाराज स्टेडियमवर येतील व दुपारी बारा वाजता कृष्णा कृषी व औद्योगिक प्रदर्शनास उपस्थित राहतील. दुपारी दीड वाजता ते हेलिकॉप्टरने फलटणकडे रवाना होतील. दुपारी सव्वादोन वाजता त्यांचे काळज (ता. फलटण) येथील हेलिपॅडवर आगमन होईल.

अडीच वाजता त्यांच्या हस्ते नीरा- देवघरच्या बंदिस्त पाइपलाइनच्या कामाचा प्रारंभ होईल. त्यानंतर पावणेचार वाजता मोटारीने ते यशवंतराव चव्हाण हायस्कूल फलटणकडे जातील. चार वाजता त्यांचे हायस्कूलच्या मैदानावर आगमन होईल व येथे जाहीर सभा होईल. पाच वाजता फलटण हेलिपॅडकडे रवाना होतील. सव्वापाच वाजता ते हेलिकॉप्टरने पुण्याकडे रवाना होतील.

Ranjitsinh Naik-Nimbalkar, Devendra Fadnavis, Udayanraje Bhosale
Maratha Reservation : 55 लाख कुणबी नोंदी सापडल्या मग दाखला का नाही? मनोज जरांगेंनी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com