Shivendraraje Bhosale, Jaykumar Gore, Atul Bhosale News: महाराष्ट्र विधानसभा निवडणूकसाठी भारतीय जनता पक्षाने आज(रविवार) 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या पहिल्या यादीत सातारा जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची नावे आहेत. यामध्ये सातारा जावळीतून शिवेंद्रराजे भोसले, माण- खटाव मतदारसंघातून जयकुमार गोरे या दोन विद्यमान आमदारांना तर कराड दक्षिण मतदारसंघातून डॉ. अतुल भोसले यांच्या नावाचा समावेश आहे. यापैकी शिवेंद्रसिंहराजे वगळता जयकुमार गोरे आणि अतुल भोसले यांना महाविकास आघाडीच्या उमेदवारांशी दोन हात करावे लागणार आहेत.
विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार कोण असणार याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. कारण येत्या 22 तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची करण्यास सुरुवात होणार आहे.
त्यामुळे सर्वच पक्षांनी आपापल्या उमेदवारी याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. आज भारतीय जनता पक्षाने (BJP) आपल्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये सातारा जिल्ह्यातील सातारा- जावळी, माण- खटाव व कराड दक्षिण या तीन मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले. यामध्ये आमदार शिवेंद्रराजे भोसले व जयकुमार गोरे या दोन विद्यमान आमदारांचा समावेश आहे.
सध्या सातारा- जावळी मतदारसंघात भाजपचे शिवेंद्रराजे भोसले(Shivendraraje Bhosale) यांच्या विरोधात अजून तरी सक्षम उमेदवार महाविकास आघाडीला सापडलेला नाही. त्यामुळे येथील निवडणूक एकतर्फी मानली जात आहे. दुसरीकडे माण-खटावमध्ये जयकुमार गोरे यांच्या विरोधात महाविकासाकडे इच्छुकांची मोठी गर्दी आहे.
या इच्छुकातील एकाच्या नावावर एकमत करण्यासाठी शरद पवार आज मुंबईत बैठक घेत आहेत. त्यांची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. त्यामुळे संध्याकाळी उशीरापर्यंत किंवा उद्या सकाळी त्यांचा या मतदारसंघातील उमेदवार राष्ट्रवादी शरद पवार गट जाहीर करणे शक्य आहे.
कराड दक्षिणमध्ये विद्यमान काँग्रेसचे (Congress) आमदार पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध भाजपचे डॉ. अतुल भोसले यांच्या तुल्यबळ लढत आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांना कराड दक्षिणमधून चांगले मताधिक्य मिळाले होते.
त्यामुळे भाजपच्या आशा पल्लवी झाल्या असून हाच ट्रेंड विधानसभेला राहील अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे खासदार उदयनराजे स्वतः अतुल भोसले यांच्या मदतीसाठी कराड दक्षिणमध्ये लक्ष घालण्याची शक्यता आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.