Nagpur BJP News : नागपूरमध्ये 'या' एकमेव आमदाराला भाजपने ठेवले होल्डवर!

Nagpur Vidhan Sabah Election and BJP : 'या' मतदारसंघात आता भाजप भाकरी फिरवणार असल्याची जोरदार चर्चा येथे सुरू आहे.
Pune BJP
Pune BJPSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Central Assembly Constituency News : भाजपने नागपूर शहरातील सहापैकी तीन आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. मात्र मध्य नागपूर विधानसभा मतदार संघ होल्डवर ठेवला आहे. त्यामुळे सलग तीन वेळा निवडून आलेले विद्यमान आमदार विकास कुंभारे यांची धडधड वाढली आहे. या मतदार संघात आता भाजप भाकरी फिरणार असल्याची जोरदार चर्चा येथे सुरू आहे. भाजपचे विधान परिषद सदस्य प्रवीण दटके यांचे नाव येथून आघाडीवर आहे.

मध्य नागपूर मुस्लिम आणि हलबा बहुल मतदार संघ म्हणून ओळखला जातो. अनेक वर्षे मुस्लिम समाजाचे या मतदार संघावर वर्चस्व होते. माजी मंत्री अनिस अहमद येथून लढत होते. हलबा समाजाचे विकास कुंभारे यांनी अनिस अहमद यांना ब्रेक दिला. कुंभारे पंधरा वर्षांपासून या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

मागील निवडणुकीत कुंभारे थोडक्यात बचावले होते. काँग्रेसचे(Congress) उमेदवार बंटी शेळके यांनी त्यांना चांगलेच झुंजवले होते. हलबा समाज कुंभारे यांच्या पाठीशी राहिल्याने ते तरले होते. मात्र आता त्यांच्या बाबत मतदारसंघात मोठी नाराजी असल्याचंही बोललं जात आहे. दुसरीकडे हलबा समाजातूनच उमेदवार बदलण्याची मागणी केली जात होती.

Pune BJP
Phulambri Assembly Constituency 2024 : फुलंब्रीत भाजपने दाखवला `नारीशक्ती`वर विश्वास ; पण विरोधकांचे कडवे आव्हान

आता हलबा समाजाला उमेवारी द्यायची की इतरांना संधी द्यायची, याचा निर्णय भाजपला(BJP) घ्यायचा आहे. हलबा समाजाचे सुमारे 60 हजार मतदार येथे आहेत. त्यांना नाराज करणे भाजपला परवडणार नाही असे बोलले जाते. यातून हलबा सामजाचे माजी उपमहापौर दीपराज पारडीकर आणि महापालिकेचे स्थाई समितीचे माजी अध्यक्ष प्रवीण भिसिकर यांची नाव सध्या चर्चेत आहेत. दुसरीकडे आता इतर समाजाला संधी देण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यानी केली आहे.

Pune BJP
Keda Aher News : नाशिकमध्ये केदा आहेर यांना 'कात्रज'चा घाट; भाजपची डॉ. आहेर, सीमा हिरे यांना उमेदवारी!

दटके अनेक वर्षांपासून येथे काम करीत आहेत. ते युवा आहेत, निष्ठावान कार्यकर्ते आहेत. संघासोबत त्यांची जवळीक आहे. देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) आणि नितीन गडकरी यांच्याही गुडबुक मध्ये ते आहेत. त्यांनी निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. येथे नाराजी निर्माण होऊ नये याची खबरदारी म्हणून या मतदार संघाचे पत्ते अद्याप भाजपने उघड केले नसावे अशी भाजपात चर्चा आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com