Keda Aher News : नाशिकमध्ये केदा आहेर यांना 'कात्रज'चा घाट; भाजपची डॉ. आहेर, सीमा हिरे यांना उमेदवारी!

MLA Devayani Farande : आमदार देवयानी फरांदे यांचे नाव पहिल्या उमेदवारी यादीत नसल्याने अनेकांना बसला धक्का.
Keda Aher
Keda AherSarkarnama
Published on
Updated on

BJP Nashik Politics: भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने आज(रविवारी) राज्यातील 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीमध्ये अनेक धक्कादायक नावे आहेत. विशेषता पक्षातील विरोधकांना पक्षाने कस्पटा समान लेखल्याचे दिसत आहे.

भारतीय जनता पक्षाने नाशिक जिल्ह्यातून पाच पैकी चार विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे आमदार देवयानी फरांदे यांचे नाव यादीत नाही त्यामुळे पक्षाच्या सर्वेनुसार फरांदे यांचे नाव लटकण्याची शक्यता आहे.

भाजपने (BJP) आज आमदार डॉक्टर राहुल आहेर (चांदवड), सीमा हिरे (नाशिक पश्चिम), राहुल ढिकले (नाशिक पूर्व) आणि दिलीप बोरसे (बागलाण) या चार विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाच्या दिल्लीतील मुख्यालयातून याबाबतची यादी पक्षाचे मुख्यालय प्रभारी अरुण सिंग यांनी ही यादी जाहीर केली आहे.

Keda Aher
Vidhansabha Election 2024 : भाजपची पहिली यादी : मराठवाड्यात दोन नव्या चेहऱ्यांना संधी, तर विद्यमान सगळे आमदार पुन्हा रिंगणात!

चांदवड मतदार संघातून दोन दिवसांपूर्वी आमदार डॉक्टर आहेर यांनी कुटुंबातील विरोधामुळे उमेदवारी करण्यास नकार दिला होता. यावेळी त्यांनी पक्षाचे उपमुख्यमंत्री आणि नेते देवेंद्र फडणवीस यांना देखील याबाबत कळविण्यात आले होते.

नाफेडचे संचालक केदा आहेर या मतदारसंघातून उमेदवारीसाठी आग्रही होते, त्यांनी गेले सहा महिने प्रचार देखील केला होता. कोणत्याही परिस्थितीत यंदा उमेदवारी करणारच असा त्यांचा हट्ट होता.

मात्र आमदार डॉक्टर आहेर यांनी निर्णय जाहीर केल्यानंतर मतदार संघातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी त्याला विरोध केला होता. विद्यमान आमदार आहेर यांनाच उमेदवारी द्यावी यासाठी शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री फडणवीस यांना भेटले होते.

Keda Aher
BJP Candidates List : भाजपच्या पहिल्या यादीत इतक्या महिला उमेदवारांना संधी; चार नवे चेहरे

या सर्व घडामोडीनंतरही पक्षाने आमदार आहेर यांना उमेदवारी जाहीर केली. तर केदा आहेर यांना पक्षाने आता कात्रज चा घाट दाखवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दुखावलेले केदा आहेर काय भूमिका घेतात? याची उत्सुकता आहे.

नाशिक पश्चिम मतदार संघात देखील अशीच स्थिती आहे पक्षाच्या 16 माजी नगरसेवक आणि इच्छुकांनी विद्यमान आमदार हिरे यांना विरोध केला होता सीमा हिरे यांना उमेदवारी देऊ नये. अन्य इच्छुकांपैकी कोणालाही उमेदवारी दिल्यास पक्ष सर्व समावेशक उमेदवार म्हणून त्याचा प्रचार करील, असा दावा करण्यात आला होता. असे असतानाही पक्षाने विद्यमान आमदार हिरे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे उमेदवारीसाठी निश्चिंत असलेल्या आमदार देवयानी फरांदे(MLA Devyani Farande) यांना पक्षाने मोठा झटका दिला आहे. आमदार फरांदे यांना पुन्हा उमेदवारी दिल्यास पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी बंडखोरीचा इशारा दिला होता.

आमदार फरांदे यांच्या विषयी अनेक तक्रारी होत्या काही वादग्रस्त प्रकरणांमध्ये त्यांचे नाव घेतले जात होते. उमेदवारी यादी त्यांचे नाव नसल्याने अनेकांना धक्का बसला आहे, आता दुसऱ्या यादीत आमदार फरांदे यांची उमेदवारी जाहीर व्हावी म्हणून आमदार फरांदे समर्थक कामाला लागले आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com