Satara News : आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी साताऱ्यातील कोपरा सभेतुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना आव्हान दिले आहे. तुम्ही पालकमंत्री असताना केलेले जिल्ह्यातील एक काम सांगा, असा प्रश्न त्यांनी केला आहे. शशिकांत शिंदे सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत.
शिवेंद्रराजे म्हणाले, तुमची सत्ता होती त्यावेळी तुम्ही पालकमंत्री होता, त्यावेळी पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात ठसा उमटवणारे एक तरी काम केले आहे का? मग मत मागण्याचा तुम्हाला अधिकार आहे का,असा प्रश्न त्यांनी केला. ते म्हणाले, प्रत्येक वेळी निवडणूक आली की साताराच्या (SATARA) औद्योगिक वसाहतीचा प्रश्न उपस्थित केला जातो. पण आजपर्यंत या उद्योगासाठी वाढल्या का नाहीत आणि येथे नवीन उद्योग का आले नाही याचा विचार केला पाहिजे. देगाव एमआयडीसी चे शेतीवरील शिक्के उठविण्याचे काम आमदार शशिकांत शिंदे यांनी केले,यासाठी त्यांनी सभागृहात आवाज उठवला होता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
एकीकडे आम्ही एमआयडीसी साठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे शिक्के उठविण्याचा आणि विरोध करण्याचे काम शिंदे यांनी केले आहे.आता आम्ही निगडी व धनगरवाडी येथे शेतीची जमीन वगळून एमआयडीसी करण्यासाठी प्रयन करत आहे. देवेंद्र फडणवीस (DEVENDRA FADANVIS) यांच्यामुळे निगडी आणि धनगरवाडी येथील शिक्के उठलेले नाहीत, तेथील लोकांनी मला शब्द दिला आहे की, आम्ही एमआयडीसी साठी मदत करु. तर शिंदे यांनी आमदार, पालकमंत्री असताना देगाव एमआयडीसी चे शिक्के उठवून एमआयडीसीला विरोध केला होता, शिवेंद्रराजे म्हणाले.
सातारा लोकसभा मतदार संघामध्ये गेल्या 25 वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शशिकांत शिंदे विरूद्ध भाजपचे उदयनराजे भोसले यांच्यात लढत होते आहे. निवडणुकीच्या तोंडावर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैरव्यवहारामध्ये शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने तो प्रचाराचा मुद्दा ठरला आहे.
पाच वर्षापूर्वी झालेल्या लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादी तिकीटावर येथून निवडून आले होते. पण त्यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत उदयनराजे यांचा पराभव राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर हा मतदारसंघ शरद पवार गटाकडे कायम राहतो का,याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
(Edited by : Chaitanya Machale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.