Mumbai News : लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन जवळपास दीड महिन्याचा कालावधी झाला त्यानंतर महायुतीचे जागावाटप ठरले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली 3 मेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दोन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असताना महायुतीचे जागावाटप जवळपास ठरले आहे. उर्वरित सहा जागांपैकी पालघरची जागा भाजपने घेत नाशिकसह उर्वरित पाच जागा जागा शिवसेना शिंदे गटाला दिल्या आहेत. त्याठिकाणी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे
महायुतीमधील जागावाटपात तीन पक्षात गेल्या दोन महिन्यापासून जोरदार रस्सीखेच होती. अखेर हा जागावाटपाचा तिढा सुटला असून बुधवारी दुपारी महायुतीचा फॉर्म्युला समोर आला आहे. त्यानुसार भाजपला 28, शिवसेना शिंदे गट 5, व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 4 तर रासपचे वाटायला एक जागा आली आहे. या जागांवरील उमेदवारहे सर्वच जाहीर केले आहेत. (Mahayuti Seat Distrubution News)
महायुतीतील 42 जगाचा तिढा सुटला होता 6 जागावरून जागावाटपाचे घोड अडल होत. मात्र शिवसेना (Shivsena) शिंदे गटाने मंगळवारी मुंबईतील दोन जागेवर यामिनी जाधव, रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली तर बुधवारी कल्याणमधून श्रीकांत शिंदे (Shrikant shinde) तर ठाण्यातून नरेश म्हस्के तर नाशिकमधून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांची शिवसेना उर्वरित पाच जागा लढवणार असल्याचे ठरले.
गेल्या काही आठवड्यांपासून उर्वरित जागांवर महायुतीमध्ये खलबतं सुरू होती. खासकरून पालघरची जागा आता शिवसेना शिंदे गटाऐवजी भाजप लढणार आहे. मात्र, उर्वरित सर्व जागा शिंदेंची शिवसेना लढणार, यावर आता शिक्कामोर्तब करण्यात आला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पालघरमधून विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचे नाव चर्चेत आहे. ते आता शिवसेना शिंदे गटाऐवजी भाजपचे उमेदवार असणार असून 2014 प्रमाणे ते आता भाजपचे उमेदवार असणार आहेत. महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटल्याने सर्व उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता उर्वरित दोन दिवसात सर्वाना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.