Satara News : सातारा लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी निकालाआधीच आपल्या विजयाची घोषणा केली आहे. निकालाआधीच त्यांनी निकाल लागला, आपल्या विजयाची केवळ औपचारिकता शिल्लक आहे आहे, असा दुर्दम्य आत्मविश्वास व्यक्त केला आहे. यामुळे त्यांच्या या स्टाईलची चांगलीच चर्चा होत आहे. (Latest Marathi News)
उदयनराजे यांनी सरकनामाच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना म्हणाले, 'निकाल आताच लागला आहे. जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि त्याचं रुपांतर कालच्या नरेंद्र मोदीजींच्या (Narendra Modi) महाविजय सभेत झालं. आता माझ्या विजयाची केवळ औपचारिकता शिल्लक आहे. (Lok Sabha ELection 2024)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महायुती लोककल्याणाचा विचार करत आहे. आघाडीसारखे भ्रष्टाचाराचे नाही. भारतीय जनता पक्ष हा शिस्तबद्धपणे चालणारा पक्ष आहे. त्यामुळे आमचा विजय हा निश्चित आहे. मतदानाची आणि मतमोजणीची केवळ औपचारिकता शिल्लक आहे, विजय माझाच होईल, असे ठामपणे उदयनराजे (Udayanraje Bhosale) म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.