Satara News : सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी आमदार शिवेंद्रसिंहराजे गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे. शिवेंद्रसिंहराजे Shivendraraje Bhosale व खासदार उदयनराजे Udayanraje Bhosale यांच्यात सध्या सातारा शहरातील विकासकामांवरून वाद रंगला आहे. त्याचे पडसाद सातारा बाजार समितीच्या निवडणुकीत उमटणार आहेत. आमदार गटाने कोणत्याही परिस्थितीत खासदार गटाला बाजार समितीत शिरकाव करू न देण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे यावेळी बाजार समितीच्या निवडणुकीत दोन्ही राजांचे समर्थक समोरासमोर भिडणार आहेत.
सातारा बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी सोमवारी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यात सध्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार टोलेबाजी रंगली आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीत उदयनराजेंची सातारा विकास आघाडी विरुद्ध शिवेंद्रसिंहराजेंची नगर विकास आघाडी आणि भाजप अशी लढत होणार हे निश्चित आहे.
यातूनच पालिका हद्दीतील विकासकामांवरून दोघांत आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्याचे पडसाद सातारा बाजार समितीच्या निवडणुकीत पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आमदार गटाने बाजार समितीच्या निवडणुकीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मागील वेळी खासदार उदयनराजेंच्या गटाचे सात संचालक होते; पण त्यांनी तक्रार अर्ज देऊन राजीनामे दिले होते.
त्याच्या आधीच्या पंचवार्षिक निवडणुकीत खासदार गटाचे पाच संचालक निवडून आले होते. आमदार गटाचे सध्या ११ संचालक होते. आता यावेळेस सर्वच्या सर्व १८ जागांवर आमदार गट लढणार आहे. त्यादृष्टीने त्यांनी तयारी सुरू केली आहे.
आमदार गटाकडे सोसायटीचेच १७०० मतदार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे बाजार समितीत मनोमिलन होणार नाही. परिणामी, दोन्ही राजांच्या समर्थकांची पॅनेल एकमेकांविरोधात भिडणार आहेत. मतदारांची अंतिम यादी सोमवारी प्रसिद्ध होणार आहे. त्यामध्ये मतदारांची नेमकी संख्या समजणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.